फोटो सौजन्य - Social Media
भारतीय वाहन बाजारपेठेत आपली मजबूत पकड निर्माण केलेल्या किया इंडियाने ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या वाहनांच्या वॉरंटी कालावधीत वाढ करून ती आता ५ वर्षांवरून थेट ७ वर्षांपर्यंत नेली आहे. हा निर्णय कंपनीच्या “ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा” देण्याच्या उद्देशाचा एक भाग आहे.
किया सेल्टोस, सोनेट, सिरॉस आणि कॅरेन्स या कंपनीच्या लोकप्रिय मॉडेल्ससाठी ही नवीन योजना लागू आहे. सध्या ५ वर्षांची वॉरंटी असलेल्या ग्राहकांना ३२,१७० रुपयांपासून (कर वगळून) सुरू होणाऱ्या ५+२ वर्षांच्या कव्हरेजमध्ये अपग्रेड करता येईल. तर नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी ७ वर्षांची वॉरंटी ४७,२४९ रुपयांपासून (कर वगळून) उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा देशभरातील सर्व अधिकृत किया डीलरशिपवर उपलब्ध असेल.
किया इंडियाचे विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले, ”किया इंडिया ग्राहकांसाठी फायदे वाढवण्याप्रती आणि परिपूर्ण मन:शांतीची खात्री घेण्याप्रती कटिबद्ध आहे. आमचे वॉरंटी कव्हरेज नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी जवळपास ७ वर्षांपार्यंत वाढवत आम्ही आमच्या वेईकल्सचा टिकाऊपणा व दर्जावरील आत्मविश्वासाची खात्री देतो, तसेच आमच्या अधिकृत सर्विस नेटवर्कच्या माध्यमातून सतत पाठिंबा देत आहोत. हा उपक्रम प्रत्येक किया ग्राहकाला अपवादात्मक मालकीहक्क अनुभव आणि दीर्घकालीन मूल्य देण्याप्रती आमच्या विद्यमान कटिबद्धतेचा भाग आहे.”
या उपक्रमामुळे किया वाहनधारकांना देखभाल खर्चात मोठा फायदा मिळणार असून, त्यांच्या वाहनांच्या पुनर्विक्री किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, कंपनीच्या या पावलामुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास आणखी दृढ होईल. किया इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम अनुभव देण्याचा ध्यास कायम ठेवला आहे. त्यांच्या विविध सेवा योजनांमुळे आणि नव्या ऑफर्समुळे कंपनीने भारतीय वाहन बाजारात एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. एकूणच, किया इंडियाची ही ७ वर्षांची विस्तारित वॉरंटी योजना ही केवळ सेवा नव्हे, तर ग्राहकांशी असलेल्या दीर्घकालीन नात्याचा एक ठोस पुरावा ठरते.






