Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात दरवर्षी रस्ते अपघातामुळे 1.8 लाख मृत्यू ! अपघात 50 टक्क्याने कमी करण्यासाठी सरकार अवलंबणार ‘ही’ उपाययोजना

भारतात रस्ते अपघात आणि त्यातून होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 24, 2025 | 06:05 PM
फोटो सौैजन्य: iStock

फोटो सौैजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतात दिवसेंदिवस वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामुळे आपसूकच रस्त्यांवर वर्दळ वाढत आहे. याचा परिणाम म्हणजे भारतात रस्ते अपघातांच्या घटनेत सुद्धा वाढ झाली आहे. ज्यामुळे दरवर्षी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशावेळी या रस्ते अपघाताच्या घटना कमी कशा होतील याकडे सरकार बारकाईने विचार करताना दिसत आहे.

भारतातील रस्ते सुरक्षेबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच या मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच यावेळी ते म्हटले की जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात. ही प्रत्येक नागरिकासाठी चिंतेची बाब आहे आणि हे थांबवण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. चला जाणून घेऊया, भारतात दरवर्षी रस्ते अपघातामुळे किती जणांना आपला जीव गमवावा लागतो.

नवीन SUV च्या नावाने ग्राहकाला लावला चुना! जुनी कार विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यामुळे ग्राहकाला मिळणार लाखो रुपये

भारतातील रस्ते अपघातांची आकडेवारी धक्कादायक !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली होती की भारतात दरवर्षी सुमारे 4.8 लाख रस्ते अपघात होतात ज्यात 1.8 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि सुमारे 4 लाख लोक गंभीर जखमी होतात. यामध्ये सर्वात जास्त दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांचा समावेश आहे.

आर्थिक नुकसान आणि खराब रस्ते

अहवालानुसार, रस्ते अपघातांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला 3% जीडीपीचे नुकसान होते. एवढेच नाही तर, रस्त्यांची खराब रचना आणि अव्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर देखील रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की अनेक अपघात खराब रस्ते आणि चुकीच्या इंजिनिअरिंगमुळे होतात.

सरकारची उपाययोजना

सध्या भारत सरकार रस्ते सुरक्षेबाबत मोठ्या सुधारणांवर काम करत आहे. 2030 पर्यंत रस्ते अपघात 50% कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकारकडून अनेक महत्त्वाची पावले उचलली जात आहेत, ज्यात रस्ते सुरक्षा शिक्षण, वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी, रस्त्यांच्या डिझाइनमध्ये सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे.

Nissan Magnite खरेदी करण्यासाठी किती करावे लागेल Down Payment? ‘एवढा’ असेल EMI?

नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सरकार आणि उद्योगांचे सहकार्य महत्वाचे

उद्योग आणि सरकार यांच्यात चांगल्या समन्वयाची गरज आहे असे केंद्रीय मंत्री यांनी अधोरेखित केले आहे. रस्ते सुरक्षेबाबत नवीन योजना आणि प्रगत उपायांचा अवलंब करून आपण अपघातांची संख्या कमी करू शकतो असे त्यांचे मत आहे. यासाठी, जागरूकता मोहिमा आणि सुरक्षा नियमांचे पालन योग्यरीत्या करणे आवश्यक आहे.

Web Title: Kiren rijiju says government will reduce accidents by 50 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Accident
  • auto news
  • Road Safety

संबंधित बातम्या

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
1

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
2

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
3

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Tesla ने Model Y चे नवीन मॉडेल केले लाँच, सुरुवातीची किंमत फक्त ₹ 39 लाख
4

Tesla ने Model Y चे नवीन मॉडेल केले लाँच, सुरुवातीची किंमत फक्त ₹ 39 लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.