फोटो सौजन्य: @volklub (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक बेस्ट कार ऑफर केल्या जातात. त्यातही ऑटो कंपन्या ग्राहकांच्या आवश्यकता आणि मागणीनुसार कार ऑफर करत असतात. खरंतर आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न उराशी बाळगून अनेक जण वर्षानोवर्ष बचत करत असतात. पण सर्वांनाच एकाच वेळी कारसाठी पूर्ण पैसे भरता येत नाही. अशावेळी ते कार लोनची मदत घेतात.
भारतीय बाजारात जेव्हा जेव्हा कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा विषय निघतो तेव्हा टाटा पंचचे नाव आपसूकच मनात येते. ही एसयूव्ही बाजारात थेट निसान मॅग्नाइटशी स्पर्धा करते. निसान मॅग्नाइटच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6 लाख 14 हजार रुपये आहे. जर तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकाच वेळी पूर्ण पैसे देण्याऐवजी तुम्ही ती लोनवर देखील खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया, मॅग्नाइटसाठी किती डाउन पेमेंट आणि ईएमआय तुम्हाला द्यावा लागेल.
केव्हा लाँच होणार Royal Enfield Classic 650? कंपनीने केला खुलासा, एवढी असू शकते किंमत?
राजधानी दिल्लीमध्ये, निसान मॅग्नाइटच्या बेस व्हेरियंट व्हिसिया पेट्रोल व्हेरियंटची किंमत सुमारे 7 लाख रुपये असेल. जर तुम्ही ही एसयूव्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट देऊन खरेदी केली तर तुम्हाला बँकेकडून 6.06 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.
जर तुम्ही 5 वर्षांसाठी 9% व्याजदराने कर्ज घेतले तर तुम्हाला अंदाजे 13000 रुपये ईएमआय भरावा लागेल. जर तुम्ही हे लोन 7 वर्षांसाठी घेतले तर हा ईएमआय सुमारे 10 हजार रुपये असेल. चला या कारच्या फीचर्स आणि पॉवरट्रेनबद्दल माहिती आहे.
गेल्या वर्षीच निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट लाँच करण्यात आली होती. मॅग्नाइट फेसलिफ्टमध्ये आधुनिक आणि उत्तम डिझाइन दिले आहे, ज्यामध्ये R16 डायमंड कट अलॉय व्हील्सचा वापर केला आहे. मॅग्नाइट फेसलिफ्टला सनराइज कॉपर ऑरेंज हा नवीन रंग देण्यात आला आहे. ही एसयूव्ही एकूण 13 रंगांमध्ये लाँच करण्यात आली होती, ज्यामध्ये 8 मोनोटोन आणि 5 ड्युअल टोन कलर व्हेरियंटचा समावेश आहे.
TVS Jupiter की Honda Activa, इंजिन, फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणती स्कूटर आहे बेस्ट?
निसान मॅग्नाइटमध्ये 1.0-लिटर टर्बो इंजिन आहे. कंपनीच्या मते, ही निसान कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह 20 किमी प्रति लिटरचा मायलेज देईल आणि सीव्हीटीसह ही कार 17.4 किमी प्रति लिटरचा मायलेज देऊ शकते.
या निसान कारची सर्वात स्पेशल गोष्ट म्हणजे त्यात क्लस्टर आयोनायझर बसवण्यात आले आहे. या उपकरणाच्या मदतीने कारमधील हवा स्वच्छ करता येते. यासोबतच कारमधील हानिकारक बॅक्टेरिया देखील काढून टाकता येतात. यामुळे ग्राहकांचा प्रवास अधिक सुरक्षित होतो.