फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये ऑगस्ट 2025 मध्ये दमदार बाईक लाँच होण्याची मालिका पाहायला मिळते आहे. हाय परफॉर्मन्स पेट्रोल बाईक्ससोबतच इलेक्ट्रिक बाईक्सच्या सेगमेंटमध्येही जबरदस्त स्पर्धा निर्माण झाली आहे. नव्या तंत्रज्ञान, आकर्षक लुक्स आणि उत्तम मायलेजमुळे ग्राहकांचा प्रतिसाद प्रचंड मिळतो आहे. तरुणाईमध्ये विशेषतः स्पोर्टी डिझाइन आणि स्मार्ट फीचर्स असलेल्या बाईक्सना अधिक पसंती मिळत आहे.
भारतात, वाहन उत्पादकांकडून सतत नवीन वाहनं सादर आणि लाँच केली जातात. ऑगस्टच्या पुढील आठवड्यात, भारतात दोन नवीन बाईक लाँच होण्याची तयारी सुरू झाली आहे. चला जाणून घेऊयात, कोणती बाईक विविध फीचर्ससह लाँच होणार आहे.
Honda Motorcycle And Scooter India जुलै 2025 मध्ये 5,15,378 युनिट्सची केली विक्री, 20% वाढ
सेल्स वाढवण्यासाठी कंपनीकडून नवीन वाहनं लाँच केली जातात. ऑगस्टच्या नवीन आठवड्यात, दोन नवीन बाईक लाँच करण्याची तयारी सुरू झाली आहे. यापैकी एक बाईक इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लाँच होणार आहे तर दुसरी बाईक प्रीमियम बाईक सेगमेंटमध्ये ऑफर केली जाईल.
ओबेन इलेक्ट्रिक कडून बाजारात इलेक्ट्रिक बाईक्स ऑफर केल्या जातात. कंपनी येत्या 5 ऑगस्ट रोजी भारतात नवीन इलेक्ट्रिक बाईक म्हणून ओबेन Oben Rorr EZ मार्केटमध्ये लाँच करणार आहे. कंपनीने काही काळापूर्वी याची माहिती दिली होती. मात्र, बॅटरी आणि मोटरची क्षमता तसेच बाईकला देण्यात येणाऱ्या फीचर्सची माहिती अद्याप त्यांनी दिली नाही. ही बाईक सध्याच्या व्हर्जनपेक्षा चांगल्या फीचर्स आणि रेंजसह ऑफर केली जाऊ शकते.
‘या’ इलेक्ट्रिक कारने बनवला Guinness World Record, सिंगल चार्जमध्ये 1,205km धावणारी पहिली EV Car
प्रीमियम बाईक उत्पादक कंपनी Triumph देखील या आठवड्यात एक नवीन बाईक लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने सोशल मीडियावर या नवीन बाईकच्या लाँचिंगची माहिती देखील पब्लिश केली आहे. Triumph Thruxton ही नवीन बाईक म्हणून लाँच होण्याची अपेक्षा आहे. ही बाईक 400 सीसी सेगमेंटमध्ये कॅफे रेसर डिझाइनसह येईल. ज्यामध्ये सिंगल सीट दिली जाऊ शकते. कंपनी स्पीड आणि स्क्रॅम्बलर बाईकमध्ये वापरले जाणारे 400 सीसी इंजिन वापरेल. या बाईकची एक्स-शोरूम किंमत Triumph Speed 400 आणि Scrambler 400 च्या किमतीच्या दरम्यान असू शकते.