Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTO Vehicle Sale Rules : बेकायदा वाहन विक्रीवर आता कडक कारवाई; केंद्र सरकारची नवी नियमावली लागू

RTO Vehicle Sale Rules : केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांची खरेदी-विक्री किंवा एक्सचेंजचा व्यवसाय करणाऱ्यांनी रीतसर मान्यता घेणे कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2026 | 02:21 PM
RTO Vehicle Sale Rules

RTO Vehicle Sale Rules

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकारचा मोठा निर्णय
  • बेकायदा वाहन विक्रीवर आता कडक कारवाई
  • जाणून घ्या नवे नियम
RTO Vehicle Sale Rules : जुन्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या बाजारात चालणारा अनधिकृत दलालांचा सुळसुळाट, ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) परवाने घेणे सक्तीचा केला आहे. केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांची खरेदी-विक्री किंवा एक्सचेंजचा व्यवसाय करणाऱ्यांनी रीतसर मान्यता घेणे कायदेशीररित्या बंधनकारक असून, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

हे देखील वाचा : Turbo Engine Car : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टर्बोची क्रेझ; खरेदी करण्यापूर्वी ‘हे’ जाणून घ्या

वाहनांच्या खरेदी-विक्रीत ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नवे नियम

जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि ग्राहकांची सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ही नियमावली लागू केली आहे. त्यानुसार, जुन्या वाहनांचा व्यापार करणाऱ्या सर्व व्यक्ती व आस्थापनांना नोंदणीकृत वाहन विक्रेत्याचे अधिकृत पत्र (नमुना २९ सी) प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पत्राशिवाय यापुढे कोणालाही जुन्या करता येणार नाही. वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही.

शहराच्या विविध भागांत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी-विक्रीकरणारे अनेक मोठे आणि छोटे डीलर्स आहेत. मात्र, या बाजारात अनेक गंभीर त्रुटी होत्या. अनेकदा गाडी विकल्यानंतरही ती खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या नावावर केली जात नव्हती. केवळ ‘एनओसी’ देऊन व्यवहार चालवले जात होते. वाहन विकल्यानंतरही कागदोपत्री नाव न बदलल्यामुळे, त्या वाहनाचा वापर करून कोणताही गुन्हा किंवा अपघात झाल्यास मूळ मालकाला पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत असे. काही वेळा चोरीच्या गाड्या किंवा कागदपत्रांमध्ये फेरफार करून गाड्या विकल्याच्या तक्रारी येत होत्या. नवीन नियमांमुळे या सर्व समस्यांना पूर्णपणे आळा बसणार आहे.

आरटीओकडून वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया

  • आरटीओकडून परवाना मिळवण्यासाठी आणि वाहनांचे हस्तांतरण कायदेशीर करण्यासाठी जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्यांनी आरटीओकडे ‘नमुना २९ए’ नुसार अर्ज करावा लागेल.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक संबंधित आस्थापनेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतील.
  • पात्र विक्रेत्यांना ‘नमुना २९बी’ नुसार अधिकृत विक्रीचे प्रमाणपत्र म्हणून ‘नमुना २९सी’ दिले जाईल.
  • यामुळे वाहन विक्रेत्याला मूळ मालकाकडून गाडी विकत घेताच, ती गाडी थेट स्वतःच्या नावावर नोंदवता येईल.
  • त्यामुळे नवीन ग्राहकाला गाडी विकताना सोपे आणि सुरक्षित होईल.
हे देखील वाचा : Car Insurance खरेदी करताय? ‘या’ चूका पडू शकतात महाग; अपघातानंतर क्लेम होऊ शकतो रिजेक्ट

Web Title: Rto vehicle sale rules central government new rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • automobile news
  • Marathi News
  • RTO

संबंधित बातम्या

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी
1

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी

Inspirational Story : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा; सुगमतेच्या माध्यमातून निलेश सिंगित यांचा प्रेरणादायी प्रवास
2

Inspirational Story : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा; सुगमतेच्या माध्यमातून निलेश सिंगित यांचा प्रेरणादायी प्रवास

Satara News : उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; अन्यथा उपोषणाचा इशारा, प्रकाश साबळे आक्रमक
3

Satara News : उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; अन्यथा उपोषणाचा इशारा, प्रकाश साबळे आक्रमक

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
4

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.