Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अ‍ॅल्युमिनियम तुटवड्याने भारतीय ऑटो उद्योग चिंतेत! SIAM ची अ‍ॅल्युमिनियम स्क्रॅपवरील २.५% आयात शुल्क रद्द करण्याची सरकारकडे मागणी!

जागतिक युद्धाचे सावट आणि तुटवड्यामुळे अ‍ॅल्युमिनियमचे भाव गगनाला भिडले असताना भारतीय ऑटो उद्योगाने सरकारकडे एक अत्यंत महत्त्वाची मागणी केली आहे. या मागणीचा थेट परिणाम आगामी काळात गाड्यांच्या किमतींवर होणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 23, 2026 | 05:17 PM
अ‍ॅल्युमिनियम तुटवड्याने भारतीय ऑटो उद्योग चिंतेत! SIAM ची अ‍ॅल्युमिनियम स्क्रॅपवरील २.५% आयात शुल्क रद्द करण्याची सरकारकडे मागणी!
Follow Us
Follow Us:
  • ऑटोमोबाईल उत्पादकांच्या ‘सियाम’ संस्थेने अ‍ॅल्युमिनियम स्क्रॅपवरील २.५% आयात शुल्क पूर्णपणे हटवण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
  • जागतिक युद्ध आणि निर्बंधांमुळे स्क्रॅपचा तुटवडा निर्माण झाल्याने भारतीय वाहनांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
  • आयात शुल्क न हटवल्यास देशातील एमएसएमई स्पेयर पार्ट उत्पादक अडचणीत येऊन गाड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय ऑटोमोबाईल उत्पादकांची सर्वोच्च संस्था ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ (SIAM) ने केंद्र सरकारकडे अ‍ॅल्युमिनियम स्क्रॅपवरील २.५% मूलभूत सीमाशुल्क Basic Customs Duty पूर्णपणे हटवण्याची मागणी केली आहे. जागतिक स्तरावर अ‍ॅल्युमिनियमचा पुरवठा विस्कळीत झाला असताना या शुल्कामुळे वाहनांचा उत्पादन खर्च वाढत असल्याचे SIAM चे म्हणणे आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी अ‍ॅल्युमिनियम का महत्त्वाचे?

वाहने हलकी, अधिक मायलेज देणारी आणि पर्यावरणपूरक (इलेक्ट्रिक) बनवण्यासाठी अ‍ॅल्युमिनियमचा वापर वेगाने वाढला आहे. सध्या चारचाकी वाहनांच्या एकूण वजनापैकी सुमारे २०% आणि दुचाकींमध्ये १५% अ‍ॅल्युमिनियमचा वापर प्रामुख्याने इंजिन ब्लॉक आणि मुख्य भागांमध्ये केला जातो. देशातील एकूण दुय्यम अ‍ॅल्युमिनियमपैकी ६०% ते ६५% वापर एकटा ऑटोमोबाईल उद्योग करतो. स्क्रॅपपासून बनवलेले अ‍ॅल्युमिनियम हे प्राथमिक अ‍ॅल्युमिनियमपेक्षा १०% ते २०% स्वस्त असते आणि त्याच्या उत्पादनात कार्बन उत्सर्जनही खूप कमी होते.

Adventures Bikes: बिग अ‍ॅडव्हेंचर बाईक्सचा धमाका! EICMA 2026 मध्ये होणार दोन मोठ्या अ‍ॅडव्हेंचर बाईक्सचे ग्रँड डेब्यू!

जागतिक संकटांमुळे वाढला पुरवठ्यावर ताण

भारतात लागणाऱ्या एकूण स्क्रॅपपैकी केवळ १५% स्क्रॅप स्थानिक पातळीवर उपलब्ध होतो, तर उर्वरित ८५% स्क्रॅप आयात करावा लागतो. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अ‍ॅल्युमिनियमचे दर २७% ने वाढून ३,३७० डॉलर प्रति टनावर पोहोचले आहेत. भारत आपल्या गरजेचा २०% स्क्रॅप याच भागातून आयात करतो. युएई (UAE) ने १० जून ते ८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान स्क्रॅपच्या निर्यातीवर तात्पुरती बंदी घातली आहे. युरोपियन युनियनने  देखील गैर-ओईसीडी देशांना स्क्रॅप निर्यातीवर कडक निर्बंध लादले आहेत.

‘मेक इन इंडिया’ मुळे मागच्या दशकभारत ऑटोमोबाईल उद्योगाला नेमका काय फायदा झाला? सविस्तरपणे जाणून घ्या

आयात शुल्काचा उद्योगावर काय परिणाम होतोय?

SIAM च्या मते, २.५% आयात शुल्काचा थेट फटका एमएसएमई स्पेअर पार्ट उत्पादकांना बसत आहे. आसियान (ASEAN) देश, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये अ‍ॅल्युमिनियम स्क्रॅपवर कोणतेही आयात शुल्क नाही, ज्यामुळे भारतीय कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकणे कठीण होत आहे.

आसियान देशांतून तयार अ‍ॅल्युमिनियमचे भाग भारतात विनाशुल्क येतात, पण त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या स्क्रॅपवर मात्र २.५% कर आकारला जातो. यामुळे मेक इन इंडिया धोरणाला फटका बसतो. स्क्रॅपचे रिसायकलिंग केल्यास ९५% विजेची बचत होते आणि ९०% कमी कार्बन उत्सर्जन होते. हा पर्यावरण रक्षणाचा मुद्दाही यात महत्त्वाचा ठरतो. खाण मंत्रालयाने हे २.५% शुल्क हटवण्याची शिफारस आधीच केली असून, आता अंतिम निर्णय वित्त मंत्रालयाला घ्यायचा आहे.

Web Title: Siam seeks import duty removal on aluminium scrap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Adventures Bikes: बिग अ‍ॅडव्हेंचर बाईक्सचा धमाका! EICMA 2026 मध्ये होणार दोन मोठ्या अ‍ॅडव्हेंचर बाईक्सचे ग्रँड डेब्यू!
1

Adventures Bikes: बिग अ‍ॅडव्हेंचर बाईक्सचा धमाका! EICMA 2026 मध्ये होणार दोन मोठ्या अ‍ॅडव्हेंचर बाईक्सचे ग्रँड डेब्यू!

KTM 390 Adventure आता नव्या ग्राफिक्ससह शोरूममध्ये दाखल! इंजिन आणि फीचर्समध्ये काय आहे खास?
2

KTM 390 Adventure आता नव्या ग्राफिक्ससह शोरूममध्ये दाखल! इंजिन आणि फीचर्समध्ये काय आहे खास?

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक
3

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!
4

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.