फोटो सौजन्य: Freepik
आपली बाइक म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळ्याच विषय. बाइक जेव्हा नवीन असते तेव्हा साधा डेन्ट जरी आला तरी जीव कासावीस होतो. पण तीच बाइक जर जुनी झाली आणि अनेक समस्यांना कारण बनली तर डोकेदुखी होऊन बसते.
बाईकच्या इंजिनमधून अनेक प्रकारचे आवाज येऊ शकतात आणि यापैकी काही गंभीर समस्यांचे लक्षण असू शकतात. जर वेळीस त्याकडे लक्ष दिले नाही तर पुढे तुमची बाइक बंद पडण्याची सुद्धा शक्यता आहे. हे आवाज विविध कारणांमुळे येऊ शकतात.
पिस्टनच्या रिंग्समधील घर्षण, कनेक्टिंग रॉडमध्ये बिघाड, क्रँकशाफ्टमध्ये समस्या किंवा वाल्वमध्ये बिघाड असल्यास खटखट असा आवाज येतो. सायलेन्सरमधील खराबी, एक्झॉस्ट लीक, इंजिनमधील सैल भाग इंजिनमधून भारी आवाज बाहेर काढू शकतो. एअर फिल्टरमध्ये घाण, कार्ब्युरेटरमध्ये खराबी किंवा स्पार्क प्लगमधील खराबी इंजिनमधून दमदार आवाज बाहेर काढू शकते.
टाइमिंग चेन फेल्युअर, कॅमशाफ्ट समस्या, व्हॉल्व्ह टॅपेट्समध्ये क्लिअरन्सचा अभाव असल्यामुळे बाइकमधील धातूची अन्य धातूंबरोबर टक्कर होते ज्याचा परिणाम आपल्याला इंजिनमधील आवाजामध्ये दिसतो.
एअर फिल्टरमधील घाण, स्पार्क प्लगमधील खराबी, इंजिनमध्ये कार्बन जमा होणे हे काही सामान्य कारण असू शकतात, इंजिनमधून शांत आवाज येण्याचे. जर तुमच्या बाईकच्या इंजिनमधून कोणताही असामान्य आवाज येत असल्यास, शक्य तितक्या लवकर मेकॅनिकला भेट देणे चांगले होईल.
इंजिन ऑईलचा गैरवापर: चुकीच्या प्रकारचे इंजिन ऑइल वापरणे किंवा वेळेवर ऑइल न बदलल्याने इंजिन सीज होऊ शकते आणि वेगळा आवाज येऊ शकतो.
खराब इंधन: निकृष्ट दर्जाच्या इंधनामुळे इंजिन खराब होऊ शकते आणि आवाज येऊ शकतो.
इंजिन जास्त गरम होऊ न देणे : इंजिनला जास्त गरम होऊ दिल्याने गंभीर नुकसान तसेच विचित्र किंवा कर्कश आवाज येऊ शकतो.
हार्ड ड्रायव्हिंग न करणे: अचानक ब्रेक लावणे आणि जास्त वेगाने गाडी चालवल्याने इंजिनवर दबाव येतो ज्यमुळे इंजिनमधून आवाज येऊ शकतो.
नियमित सर्व्हिसिंग न करणे: नियमित सर्व्हिसिंग करून, इंजिनच्या किरकोळ समस्या लवकर ओळखल्या जाऊ शकतात. तसेच त्या मोठ्या होण्यापासून रोखल्या जाऊ शकतात.
तुम्ही या वरील चुका टाळल्यास, तुम्ही तुमच्या बाइकचे इंजिन चांगल्या स्थितीत ठेवू शकता आणि इंजिनमधून येणारे असामान्य आवाज टाळू शकता.