BLS International News: बीएलएस इंटरनॅशनल आणि सायप्रस उच्चायुक्तालयाचा ग्लोबल व्हिसा करार! ७० हून अधिक देशांत कार्यरत
BLS International News: जानेवारी २०२६ मध्ये बीएलएस इंटरनॅशनल या सरकार व राजनैतिक मोहिमांसाठी विश्वसनीय जागतिक तंत्रज्ञान-सक्षम सेवा सहयोगीने दक्षिण आफ्रिकेमधील रिपब्लिक ऑफ सायप्रसच्या उच्चायुक्तालयासोबत करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्याअंतर्गत सर्वसमावेशक व्हिसा आऊटसोर्सिंग सेवा देण्यात येतील. या करारामधील अटींनुसार बीएलएस इंटरनॅशनल दक्षिण आफ्रिका आणि शेजारील १० देश लेसोथो, एस्वाटिनी, मॉरिशस, बोत्सवाना, झिम्बाब्वे, झांबिया, नामिबिया, मादागास्कर, मलावी आणि मोझांबिकमध्ये सायप्रस व्हिसा अर्ज प्रक्रियेच्या कामकाजावर देखरेख ठेवेल. कंपनी या व्यापक प्रांतामध्ये सुव्यवस्थित, सुरक्षित व ग्राहक-अनुकूल व्हिसा सेवा देईल. या सहयोगाचा भाग म्हणून बीएलएस इंटरनॅशनल सर्व ११ देशांमधील अर्जदारांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत धोरणात्मकरित्या व्हिसा अर्ज केंद्रे स्थापित करेल.
तंत्रज्ञान-केंद्रित व्हिसा सेवांव्यतिरिक्त ही केंद्रे अर्जदारांना मूल्यवर्धित प्रीमियम सेवा देतील, ज्या ग्राहकांचा प्रवास सोपा करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. पर्यायी प्रीमियम सेवा आहेत डॉक्यूमेंटेशन सेवा, ट्रॅकिंग सेवा, कुरिअर सेवा, प्रवास विमा सुविधा, परकीय चलन सेवा, प्राइम टाइम अपॉइंटमेंट सेवा, अर्ज भरण्यासाठी सहाय्य आणि सल्लामसलत सेवा. या सर्व सेवा बीएलएस इंटरनॅशनलच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये एकीकृत करण्यात आल्या आहेत, ज्यामधून वास्तविक कनेक्टेड अनुभव मिळेल.
बीएलएस इंटरनॅशनलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक शिखर अग्रवाल म्हणाले, ”या सहयोगाने राजनैतिक मोहिमांचा आमच्या तंत्रज्ञान-संचालित सोल्यूशन्सवर असलेला वाढता विश्वास अधिक दृढ केला आहे. आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन आणि क्लाऊड-आधारित प्रोसेसिंग सिस्टम्सचे पाठबळ असलेली प्रबळ डिजिटल परिसंस्था डिझाइन केली आहे, जी प्रत्येक टचपॉइण्टवर गती, सुरक्षितता व पारदर्शकतेची खात्री देते. आज आम्ही व्हिसा प्रक्रिया सेवा देत आहोत, तसेच आम्ही नाविन्यतेच्या माध्यमातून सीमेपलीकडे भावी गतीशीलता देत आहोत, सोल्यूशन्स देत आहोत, जे कार्यक्षमता व ग्राहक समाधानासाठी नवीन उद्योग मानके स्थापित करतात.”
बीएलएस इंटरनॅशनलच्या प्रबळ विकासगतीला सादर करत रिपब्लिक ऑफ सायप्रसच्या उच्चायुक्तालयासोबत हा सहयोग मोठी झेप दर्शवतो. आर्थिक वर्ष २६ कंपनीसाठी धोरणात्मक विस्तारीकरणाचे ठरले आहे, जेथे बीएलएस इंटरनॅशनल चीनमध्ये भारताकडून, रशिया व कझाकिस्तानमध्ये सायप्रसकडून प्रमुख करार आणि स्लोव्हाकियाकडून जागतिक करार मिळवले आहेत. ही गती कंपनीच्या आतापर्यंतच्या प्रबळ तिमाही कामगिरीमधून दिसून आली. आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत बीएलएस इंटरनॅशनलने एकत्रित ७३६.६ कोटी रूपये महसूलाची नोंद केली, ज्यामध्ये वार्षिक ४८.८ टक्के वाढ झाली, तसेच निव्वळ नफा वार्षिक २७.४ टक्के वाढीसह १८५.७ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. ७० हून अधिक देशांमध्ये उपस्थिती आणि आतापर्यंत ३६० दशलक्षहून अधिक अर्जांची प्रक्रिया करण्यासह बीएलएस इंटरनॅशनल कॉन्सुलर आऊटसोर्सिंग उद्योगामध्ये नेतृत्व करत आहे, जेथे नाविन्यता, अनुपालन आणि ग्राहक समाधानावर लक्ष केंद्रित केले आहे.






