फोटो सौजन्य: YouTube
भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राबद्दल बोलले जात आहे टाटा मोटर्सचे नाव नाही घेतले जाणार असे होणार नाही. टाटा मोटर्स नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी उत्तोमोत्तम कार्स मार्केटमध्ये आणत असते. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कार्सवर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीकडून नुकतेच पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह Tata Curvv लाँच करण्यात आली आहे. कारप्रेमींमध्ये या कारविषयी खूप उत्सुकता आहे.
टाटा मोटर्सने Tata Curvv चे ICE व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहे. त्याची EV आवृत्ती कंपनीने ऑगस्ट महिन्यातच लाँच केली होती ज्याची एक्स-शोरूम किंमत रु. 17.49 लाख आहे. ऑगस्ट महिन्यात या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करताना कंपनीने माहिती दिली होती की एसयूव्हीच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या किंमती 2 सप्टेंबरला जाहीर केल्या जातील.
हे देखील वाचा: ‘या’ 5 पॉवरफुल पेट्रोल स्कुटर्स समोर बाईक्स सुद्धा फेल, किमंतही स्वस्त
या ICE आवृत्तीमध्ये किती प्रकारचे इंजिन पर्याय दिले आहेत? SUV मध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही SUV एकूण तीन इंजिन पर्यायांसह आणण्यात आली आहे. ज्यामध्ये दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. पहिला पर्याय म्हणून 1.2 लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. दुसरा पर्याय म्हणून 1.2 लिटर क्षमतेचे हायपेरियॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तिसरे इंजिन म्हणून 1.5 लिटरचे क्रायोजेट इंजिन देण्यात आले आहे.
Tata Curvv EV प्रमाणे, ICE व्हर्जनमध्येही उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये सहा एअरबॅग्ज आहेत. तर सुरक्षिततेसाठी, i-TPMS, ट्रॅक्शन कंट्रोल, थ्री पॉइंट सीटबेल्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, 360 डिग्री कॅमेरा, रिअर पार्किंग सेन्सर, रिअर डिफॉगर, ISOFIX चाइल्ड अँकरेज, इमोबिलायझर, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, EPB, ABS, EBD, लेव्हल-2 ADAS सारखी सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.
Tata Curvv ICE ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. याचा स्मार्ट व्हेरियंट या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. Hyperion इंजिनसह त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर डिझेल इंजिन व्हेरियंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
एसयूव्हीच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 17.69 लाख रुपये ठवण्यात आली आहे. या किंमती फक्त इंट्रोडक्ट्री आहेत आणि 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत या किंमतीत Curve खरेदी केली जाऊ शकते.