Tata Sales: जुलै महिन्यात टाटा कार्सच्या विक्रीत वाढ (फोटो सौजन्य - Tata Punch)
१. Tata Punch – या टाटा कारने जुलै २०२६ मध्ये विक्रीच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. जुलैमध्ये एकूण २१,३१३ युनिट्सची विक्री झाली. वार्षिक तुलनेत विक्रीत ९८% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये १०,७८५ युनिट्सची विक्री झाली होती.
२. Tata Nexon – जुलैमध्ये १७,४७१ खरेदीसह टाटा नेक्सॉन ही देशातील दुसरी सर्वाधिक विकली जाणारी कार होती. गेल्या वर्षी नेक्सॉनच्या १२,८२५ युनिट्सची विक्री झाली.
३. Tata Tiago – टाटा टियागो विक्रीच्या तक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे, जुलैमध्ये ७,४२९ ग्राहकांनी ही गाडी खरेदी केली. वार्षिक तुलनेत विक्रीत ३३ टक्क्यांनी वाढ झाली.
४. Tata Sierra – जुलै २०२६ मध्ये टाटा सिएरा ६,३२७ युनिट्सच्या विक्रीसह चौथ्या क्रमांकावर आहे. ही टाटाच्या अलीकडेच लॉन्च झालेल्या सर्वात लोकप्रिय वाहनांपैकी एक आहे.
५. Tata Harrier – गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातील २,२१६ ग्राहकांच्या तुलनेत, जुलै २०२६ मध्ये हॅरियरला एकूण ३,३०१ ग्राहक मिळाले, म्हणजेच विक्रीत ४९ टक्क्यांची वाढ झाली.
६. Tata Altros – सहाव्या क्रमांकावर असलेली ही कार जुलै २०२६ मध्ये २,८६२ लोकांनी खरेदी केली. वार्षिक तुलनेत तिच्या विक्रीत २७ टक्क्यांनी घट झाली.
७. Tata Curve– जुलै महिन्यात एकूण १,६९७ लोकांनी टाटा कर्व्ह खरेदी केली. मात्र, गेल्या वर्षी जुलैमध्ये ही गाडी २,००५ लोकांनी खरेदी केली होती.
८. Tata Safari – विक्रीच्या तक्त्यात आठव्या क्रमांकावर असलेल्या टाटा सफारीच्या १,४५३ गाड्या विकल्या गेल्या. तिच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत १७ टक्के वाढ झाली.
९. Tata Tigor – जुलै २०२६ मध्ये ७५८ लोकांनी टाटा टिगोर खरेदी केली. तिच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत २२ टक्क्यांनी घट झाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये ही गाडी ९६८ लोकांनी खरेदी केली होती.
Flying Car: उत्तराखंडच्या तरूणाने केली कमाल, उडणाऱ्या कारची चाचणी यशस्वी; पहा व्हिडिओ






