फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्र टाटा मोटर्सशिवाय अपुरे आहे. आज टाटा मोटर्सच्या कार भारतातच नव्हे, तर विदेशात देखील लोकप्रिय आहेत. अनेक वर्षांपासून कंपनी ग्राहकांच्या विविध मागणी आणि आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या उत्तम कार ऑफर करत आहे. या कंपनीने नेहमीच तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि किमतीचा योग्य ताळमेळ साधला आहे. टाटा मोटर्सने देशात फोर व्हीलर श्रेणीत आपली छाप सोडली आहे, आणि आज त्याची कार्स ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
सध्या, इलेक्ट्रिक वाहने आणि पर्यावरणीय मुद्द्यांचा विचार करून कंपनी EV (इलेक्ट्रिक व्हेइकल) क्षेत्रावर अधिक लक्ष देत आहे.टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारला मार्केटमध्ये उत्तम मागणी आहे. कंपनीने उत्कृष्ट EV मॉडेल्स सादर करून आपली क्षमता सिद्ध केली आहे.
टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत एक मोठा टप्पा गाठला आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत दोन लाख युनिट्सचा आकडा ओलांडला आहे. या निमित्ताने, टाटा कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे, जी पुढील 45 दिवस सुरू राहील.
टाटा कंपनीने त्यांच्या सर्व इलेक्ट्रिक कारवर एक खास ऑफर आणली आहे. टाटाच्या या ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस आणि 100% ऑन-रोड फायनान्स पर्याय समाविष्ट आहे. यासोबतच, कंपनीने टाटा पॉवर चार्जिंग स्टेशनवरून मोफत चार्जिंगच्या फायद्याची मर्यादाही सहा महिन्यांनी वाढवली आहे. कंपनी इलेक्ट्रिक कार खरेदीवर 7.2 किलोवॅट एसी फास्ट होम चार्जरची मोफत स्थापना देखील देत आहे.
Hyundai च्या कार खरेदी करण्यासाठी महत्वाची बातमी, कंपनीची ‘ही’ कार झाली महाग
टाटाने आपल्या ग्राहकांसाठी लॉयल्टी बोनस देखील आणला आहे. ही ऑफर त्यांच्यासाठी आहे, ज्यांच्याकडे आधीच या ब्रँडची कार आहे. ज्या टाटाच्या ग्राहकांकडे आधीच इलेक्ट्रिक कार आहे, त्यांनी नवीन नेक्सॉन ईव्ही किंवा कर्व्ह ईव्ही खरेदी केल्यास त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस दिला जात आहे. तर, ज्या ग्राहकांना ICE व्हेरियंट आहेत त्यांना 20 हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे.
टाटा मोटर्स ही भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात मोठी रेंज असलेली कंपनी आहे. टाटाने अलीकडेच भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये हॅरियर ईव्ही आणि सिएरा ईव्ही सादर केले. टाटाच्या या दोन्ही नवीन इलेक्ट्रिक कार या वर्षाच्या अखेरीस बाजारात लाँच केल्या जाऊ शकतात.