फोेटो सौजन्य: Freepik
सध्या भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही सेगमेंटच्या कार मॉडेल्सची मागणी मोठ्या प्रमाणत वाढत आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहा महिन्यांचा विचार केल्यास म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत टाटा पंच( Tata Punch) ही सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे. टाटा पंचने या सहामहिन्याच्या कालावधी दरम्यान तब्बल 1,01,120 युनिट्सची विक्री केली आहे. या विक्रीमुळे कारच्या वार्षिक विक्रीत 40.19 टक्क्यांची वाढ झाली आहे. टाटा पंचंची मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 72,626 युनिट्सची होती. त्यामुळे या कारने मोठी झेप घेतली असून भारतीय ग्राहकांच्या मनात घर केले आहे.
एसयुव्ही सेगमेंटमध्ये Hyundai Creta ही कार विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे, 15.20 टक्के वार्षिक वाढीसह 96,416 युनिट्सची विक्री झाली आहे. तर, मारुती सुझुकी ब्रेझा ही कार तिसऱ्या स्थानावर असून या कारच्या 93,659 युनिट्सची विक्री झाली आहे. ब्रेझाची वार्षिक वाढ 14.31 टक्के होती.
चौथे आणि पाचवे स्थान
महिंद्रा स्कॉर्पिओ ही चौथ्या स्थानावर असून या कारचे 81,293 युनिट्स विक्री झाले आहे. त्यामुळे स्कॉर्पिओच्या विक्रीत 35.83 टक्के वार्षिक वाढ झाली आहे. तर, मारुती सुझुकीची फ्रॉन्क्स कार पाचव्या स्थानावर आहे, ज्या कारची 16.32 टक्क्यांच्या वाढीसह 73,841 युनिट्सची विक्री झाली आहे.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
या कारच्या विक्रीत झाली घसरण
टाटा नेक्सॉन ही कार सहाव्या स्थानावर असून तिची विक्री 8.38 टक्क्यांच्या वार्षिक घसरणीसह 72,350 युनिट्स आहे. Hyundai Venue सातव्या स्थानावर असून या कारचे 56,521 युनिट्स विक्री झाले आहेत आणि 10.81 टक्के वार्षिक घट नोंदवली गेली.
महिंद्रा XUV 300 मध्ये वाढ, मारुती सुझुकी विटारात घट
मारुती सुझुकीची ग्रॅंड विटारा ही कार आठव्या स्थानावर आहे. विटाराच्या विक्रीत 6.67 टक्क्यांनी घट झाली आहे. या सहामहिन्यात विटाराची विक्री 55,751 युनिट्सची होती. Kia Sonet कार 40.83 टक्के वाढीसह 55,017 युनिट्सच्या विक्रीसह नवव्या स्थानावर आहे. टॉप १० मध्ये दहाव्या स्थानावर महिंद्रा कंपनीची XUV 300 होती या कारची विक्री 69.65 टक्के वार्षिक वाढीसह 50,501 युनिट्स होती.
एप्रिल ते सप्टेंबर 2024 च्या एसयुव्ही कार विक्रीचा आढावा घेतला तर असे दिसते की टाटा पंचने जबरदस्त विक्री वाढ नोंदवली आहे. तर इतर कंपन्यांच्या कार्सनेही विक्रीत वाढ नोंदवली आहे मात्र काही वाहनांच्या विक्रीत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे.