बांगलादेश अ महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ च्या अंतिम फेरीत दाखल(फोटो-सोशल मीडिया)
Bangladesh A Women vs Pakistan A Women : बांगलादेश अ महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ च्या अंतिम धडक मारली आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात बांगलादेश अ संघाने पाकिस्तान अ संघाला ५४ धावांनी हरवून अंतिम फेरीत स्थान पक्के केले. या पराभवामुळे पाकिस्तानचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न आता भंग पावले आहे. अंतिम सामन्यात बांग्लादेषसमोर भारताचे आव्हान असणार आहे.
महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चा अंतिम सामना आता भारत अ आणि बांगलादेश अ संघात खेळवला जमणार आहे. हा सामना २२ फेब्रुवारी रोजी बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट मैदानावर खेवळण्यात येणार आहे. भारतीय महिला अ संघाने श्रीलंका अ संघाचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
बँकॉकमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि बांग्लादेश संघला फलंदाजीसाठी आमंत्रित केल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. हा संघ नियमित अंतराने विकेट्स गामावत राहीला. संपूर्ण संघ फक्त ११० धावांवर गारद झाला. बांगलादेशची कर्णधार फहिमा खातूनने शानदार फलंदाजी करत ३२ चेंडूत सर्वाधिक ४० धावा केल्या. या खेळीत फहिमाने पाच चौकार लगावले. तिला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळू शकली नाही. शर्मिन सुलतानाने १५ धावा दिल्या, तर शमीमाने १३ धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार हफसा खालिदने चार षटकांत फक्त २५ धावा देऊन दोन बळी टिपले.
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा (महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६)संघ ५६ धावांवरच कोसळला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानचा फलंदाजी क्रम पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखा कोसळला. पाकिस्तानकडून फक्त तीन फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंत मजल मारू शकले. संपूर्ण संघ ५६ धावांवर गारद झाला. शवाल झुल्फिकारने सर्वाधिक १४ धावांची खेळी केली. हफसाने १५ चेंडूत १२ धावा केल्या. इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंत जाता आले नाही. चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. बांगलादेशची संजिदा अख्तर मेघलाने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर फहिमा खातूनने २ बळी घेतली.
अंतिम फेरीत बांगलादेशचा सामना भारताशी होईल. पहिल्या उपांत्य फेरीत, राधा यादवच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.






