पाकिस्तान आर्मीचा नागरिकांवर हल्ला (फोटो- ai gemini)
रावळकोटमध्ये एका चौकात पाकिस्तानी सैन्याने नागरिकांच्या घरांवर ड्रोन आणि अंदाधुंद गोळीबार करत भीषण हल्ला केला आहे. या अमानुष कारवाईत आतापर्यंत ३ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सैन्याने पहाटे 5 वाजल्यापासून रावळकोट परिसरात अंदाधुंद गोळीबार केला आहे. तसेच ड्रोन हल्ला केला आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण शहरात युद्धासारखी स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.
Pakistan Mosque Blast: मशिदीजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवले; पाकिस्तानात रक्ताचा पाऊस!
November 5 | Rawalakot, Kashmir: Dozens of young people have been injured and killed by Pakistani army gunfire in Rawalakot. At this moment, the only sounds heard across the city are mosque announcements, army gunfire and ambulance sirens. https://t.co/sSbYGWOq2Q — برهان الدین | Burhan uddin (@burhan_uddin_0) November 5, 2026
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिवसेंदिवस हिंसा वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाकिस्तानी सेना जाणीवपूर्वक आणि पूर्वनियोजित पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या घरांना तसेच निशस्त्र आंदोलकांना आपले लक्ष्य करत असल्याचा आरोप केला जात आहे. जून २०२६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये व्यापक निदर्शने सुरू करण्यात आली आहेत.
इंधन संकट वाढलं…Pakistan मध्ये Lockdown ची वेळ! रात्री 8 नंतर पसरणार शुकशुकाट; काय परिस्थिती?
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेले तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. हा संघर्ष आता मर्यादित राहिला नसून पाकिस्तान सरकार आणि स्थानीक जनता यांच्यात असलेल्या दरीचे स्वरूप दर्शवत आहे. सुरुवातीला स्वस्त दरात वीज आणि गव्हाचे पीठ मिळावे या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झाले होते. परंतु, आता या आंदोलनाची व्याप्ती कमालीची वाढली आहे. हा संघर्ष आता अधिक वाढण्याच शक्यता आहे.
Ans: पाकिस्तानी सैन्याने पीओकेमध्ये नागरिकांवरच हल्ला केल्याचे समोर आले आहे.
Ans: पाकव्याप्त काश्मीरमध्ये जून २०२६ व्यापक निदर्शने सुरू झाली आहेत.






