(फोटो सौजन्य-AI एआय)
टीव्हीएस NTORQ 150 मध्ये 149.7cc एअर-कूल्ड, O3C टेक्नॉलॉजी असलेले इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 13.2 PS पॉवर आणि 14.2Nm टॉर्क तयार करते. स्कूटरचा टॉप स्पीड 104kph आहे. वर्किंगच्या बाबतीत 0-60kph वेग पकडण्यासाठी फक्त 6.3 सेकंद लागतात. त्यामुळे रोजच्या वापरासोबत वेगवान आणि स्पोर्टी राइडिंगचा एक्सपिरीयंस देण्यावर या मॉडेलचा भर आहे.
सुरक्षेच्या बाबतीतही NTORQ 150 मध्ये जास्त लक्ष देण्यात आले आहे. यात सिंगल-चॅनेल ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम म्हणजेच TCS देण्यात आली आहे. याशिवाय स्विचेबल राइडिंग मोड्स आणि इंटरॅक्टिव्ह असिस्ट सिस्टिम्स मिळतात. प्रीमियम स्कूटर सेगमेंटमध्ये या फीचर्समुळे मॉडेलची टेक्निकल बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कनेक्टेड फीचर्स हे या स्कूटरचे आणखी एक आकर्षण आहे. टीव्हीएस SmartXonnect टेक्नोलॉजीच्या माध्यमातून 50 पेक्षा जास्त कनेक्टेड सुविधा मिळतात. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्स यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे तरुण रायडर्सना लक्षात घेऊन तयार केलेली स्कूटर अशी तिची ओळख निर्माण होते.
टीव्हीएसची नेपाळमधील जगदंबा मोटर्ससोबतची पार्टनरशिप 2015 पासून आहे. त्यामुळे देशभरातील विक्री आणि आफ्टर-सेल्स नेटवर्कचा आधार कंपनीला मिळतो. याआधी नेपाळमध्ये टीव्हीएसचा भर 125cc NTORQ सेगमेंटवर होता. आता NTORQ 150च्या माध्यमातून कंपनीने प्रीमियम परफॉर्मन्स स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नेपाळच्या स्पोर्टी स्कूटर मार्केटमध्ये टीव्हीएस, यामाहा आणि होंडा यांच्यातील स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे.






