Breaking News Updates Today: परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकारची तयारी सुरु, असा आहे प्लॅन...
04 Mar 2026 09:30 AM (IST)
नवी दिल्ली : अमेरिका-इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे एक नवीन जागतिक संकट निर्माण झाले आहे. या संघर्षाचा परिणाम भारतावरही होत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे इराण आणि आखाती देशांतून इंधन पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. हे युद्ध दीर्घकाळ चालू राहिले तर देशात एलपीजीचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
04 Mar 2026 09:20 AM (IST)
डोंबिवली येथून एक मसणूकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा अपघात झाला, त्यात तो जखमी झाला. त्यावेळी जखमीला रिक्षातून हॉस्पिटलला घेऊन जात असतांना सोबत असलेल्या व्यक्तीने जखमीला लुटल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या नराधमाला विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
04 Mar 2026 09:10 AM (IST)
भारतात 4 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 16,761 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,364 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,571 रुपये आहे. भारतात 4 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,53,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,67,610 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,710 रुपये आहे. भारतात 4 मार्च रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 294.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,94,900 रुपये आहे.
04 Mar 2026 09:03 AM (IST)
Mojtaba Khamenei become Iran’s New Supreme Leader : तेहरान : गेल्या काही दिवसांपासून मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणमध्ये संघर्षाचे वातावरण होते. या संघर्षात इराणचे माजी सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. यामुळे इराणला मोेठा झटका बसला होता. दरम्यान आता इराणच्या राजकीय घडामोडींमध्ये आता नवा अध्याय सुरु झाला आहे. अयातुल्ला खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र मोजतबा खामेनेई याची इराणचे नवे सुप्रीम लीडर म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिका-इस्रायललासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
04 Mar 2026 08:57 AM (IST)
फिरायला आवडणारे लोक वर्षातून किमान एक तरी ट्रिप प्लॅन करतच असतात. तुमचंही स्वप्न आहे का काश्मीरच्या निसर्गरम्य दऱ्यांमध्ये फिरण्याचं? बर्फाच्छादित पर्वत, शांत तलाव, शिकाऱ्यांची सफर आणि रंगीबेरंगी ट्युलिप गार्डन यामुळे काश्मीरला “धरतीवरील स्वर्ग” म्हटलं जातं. मार्च ते एप्रिल या काळात इथला निसर्ग विशेष खुलून दिसतो. अशा वेळी भारतीय रेल्वेचं खास काश्मीर टूर पॅकेज प्रवाशांसाठी उत्तम संधी ठरू शकतं.
04 Mar 2026 08:15 AM (IST)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. यामुळे मोठी हानीही झाली आहे. या हल्ल्याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन करून स्पष्ट शब्दांत भारताची चिंता व्यक्त केली. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतर आणि तेहरानवरील प्राणघातक हल्ल्यांनंतर ‘हिंसाचाराचे चक्र आता थांबले पाहिजे,’ असे मोदींनी नेतन्याहूंना बजावले.
04 Mar 2026 08:01 AM (IST)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. यामुळे मोठी हानीही झाली आहे. या हल्ल्याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यात अनेक भारतीय या देशांत अडकलेले आहेत. त्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून विशेष तयारी केली जात आहे.
Maharashtra to World Breaking News: अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी ईराणवर केलेल्या हल्ल्यांचा गंभीर परिणाम पाहायला मिळत आहे. या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विमान सेवा देखील विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु झाले आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की, अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. गरजेनुसार विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाणे चालवत आहेत.






