आजकालच्या तरुण पिढीसाठी ओला, उबर किंवा झोमॅटो, स्विगी या कंपन्या पार्ट-टाइम आणि फुल-टाइम कमाईचे एक मोठे साधन बनल्या आहेत. हातात स्मार्टफोन आणि स्वतःची गाडी असेल, तर कोणीही सहज हे काम सुरू करू शकतो. पण कायद्याच्या भाषेत बोलायचे झाले, तर तुम्ही जेव्हा या कंपन्यांसाठी गाडी चालवता, तेव्हा तुम्ही ‘व्यावसायिक’ काम करत असता. अशा वेळी तुमचे वैयक्तिक लायसन्स चालते की ट्रान्सपोर्ट लायसन्स लागते? आणि पिवळी पाटी असलेल्या गाड्यांचे नियम काय आहेत? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया.
१. झोमॅटो, स्विगी आणि डिलिव्हरी बॉईज (टू-व्हीलर) साठी नियम
जर तुम्ही झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट किंवा डोमिनोज सारख्या कंपन्यांमध्ये फूड किंवा किराणा डिलिव्हरीचे काम करत असाल, तर तुमच्याकडे MCWG (Motorcycle With Gear) हे सामान्य वैयक्तिक लायसन्स असणे पुरेसे आहे.
सध्याच्या नियमांनुसार, टू-व्हीलरवरून डिलिव्हरी करण्यासाठी विशेष ट्रान्सपोर्ट लायसन्सची किंवा पिवळ्या नंबर प्लेटची सक्ती नाही. तुम्ही तुमच्या पांढऱ्या नंबर प्लेटच्या वैयक्तिक बाईकवरून हे काम कायदेशीररित्या करू शकता. मात्र, काही शहरांमध्ये कमर्शियल ई-बाईक्ससाठी (ज्या भाड्याने घेतल्या जातात) पिवळ्या रंगाची नंबर प्लेट वापरली जाते, पण चालकासाठी साधं लायसन्स चालतं.
Ola Electric च्या अडचणी वाढल्या; ओला सीईओंना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश
२. ओला, उबर आणि रॅपिडो कॅब ड्रायव्हर्स (फोर-व्हीलर) साठी नियम
फोर-व्हीलर किंवा कॅब चालवणाऱ्यांसाठी नियम पूर्णपणे बदलतात आणि ते खूप कडक आहेत.
३. पांढऱ्या पाटीच्या गाडीत ओला/उबर चालवली तर काय होईल?
अनेक लोक कमाई करण्यासाठी स्वतःची वैयक्तिक पांढऱ्या पाटीची कार ओला/उबर किंवा रॅपिडो बाईक टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवतात. हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. आरटीओ फ्लाइंग स्क्वॉडने पकडल्यास गाडी जप्त होऊ शकते आणि १०,००० रुपयांपर्यंत मोठा दंड होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशा गाड्यांचा अपघात झाल्यास विमा कंपनी क्लेम देण्यास पूर्णपणे नकार देते.
थोडक्यात सांगायचे तर डिलिव्हरी बॉय असाल तर साधं बाईक लायसन्स आणि पांढरी पाटी चालेल. पण ओला-उबर कॅब चालवायची असेल, तर गाडी पिवळ्या पाटीचीच हवी, तरच तुमचे एलएमव्ही लायसन्स तिथे कायदेशीररित्या वैध ठरेल.






