फोटो सौजन्य: Social Media
टाटा मोटर्स नेहमीपासूनच भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात नवनवीन आणि उत्तम कार्स लाँच करत असतात. काही महिन्यांपूर्वी कंपनीने टाटा कर्व्ह कार लाँच केली होती. नुकतेच या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यामुळेच ग्राहकांमध्ये या कारबद्दलचे विचार अधिक सकारात्मक झाले आहे. जर तुम्ही सुद्धा ही दमदार कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
हल्ली ईएमआयमुळे अनेकांना आपल्या हवी ती वस्तू घेण्याची सूट मिळते. या सेवेमुळे काही जण आयफोन घेतात तर काही कार. आजही बहुतेक जणं कार घेताना लाख रुपये डाऊन पेमेंट करून उर्वरित अमाऊंट EMI द्वारे भरतात. सध्या टाटा कर्व्ह ही कार अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. चला जाणून घेऊया २ लाखाच्या डाऊन पेमेंटवर ही कार विकत घेतल्यास आपल्याला किती ईएमआय भरावा लागेल.
Tata ने Curvv चे बेस व्हेरियंट म्हणून स्मार्ट ऑफर केली आहे. ही भारतीय बाजारपेठेत 10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध करण्यात आली आहे. ही कार खरेदी केल्यास सुमारे 70 हजार रुपयांचा रोड टॅक्स आणि सुमारे 50 हजार रुपयांचा विमा भरावा लागेल. त्यानंतर Tata Curvv Smart ऑन रोडची किंमत सुमारे 11.20 लाख रुपये होईल. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.
हे देखील वाचा: कारमधील ‘हे’ सेफ्टी फिचर देते सुरक्षेची हमखास हमी, जाणून घ्या याची काम करण्याची पद्धत
जर तुम्ही या कारचे बेस व्हेरियंट स्मार्ट खरेदी केले तर बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमत फायनान्स केली जाईल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 919546 रुपये फायनान्स करावा लागेल. जर बँक तुम्हाला 9.19 लाख रुपये सात वर्षांसाठी 9% व्याजासह देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 14795 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून 9.19 लाख रुपयांचे कार कर्ज सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी 14795 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा स्थितीत, सात वर्षांत तुम्हाला टाटाच्या या एसयूव्हीसाठी सुमारे ३.२३ लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 14.42 लाख रुपये असेल.