फोटो सौजन्य: iStock
सध्या ज्या वेगाने आपल्या देशात कार्सची संख्या वाढत आहे, त्याचप्रमाणे अपघातांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. यामुळेच आपल्याकडे वाहतुकीचे नियम बनवण्यात आले आहे. तसेच अनेक ऑटो कंपनीज सुद्धा आपल्या कार्समध्ये विविध सेफ्टी फीचर्स समाविष्ट करत आहे. कित्येक कंपनीज तर अनेक सेफ्टी टेस्ट पास करून आपली कार मार्केटमध्ये लाँच करत आहे.
भारतासह जगभरातील कार उत्पादक कंपनीज आपल्या कार्समध्ये सुधारणा करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. सर्वच कंपनीज अधिक सुरक्षिततेसाठी, कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स सुद्धा समाविष्ट करत आहेत. जे प्रवासादरम्यान अधिक सुरक्षा प्रदान करते. प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळता यावेत यासाठी कारमध्ये असेच महत्वाचे एक फिचर देण्यात आले आहे. हे सेफ्टी फिचर म्हणजे ESC (Electronic Stability Control). चला या फिचरबद्दल अधिक जाणून घेऊया.
कारमध्ये आढळणाऱ्या अनेक सेफ्टी फीचर्ससह, ESC नावाचे सुरक्षा वैशिष्ट्य देखील ऑफर केले जाते. हे फिचर बहुतेक कारमध्ये स्टॅंडर्ड फिचर म्हणून देखील दिले जाते. हे फिचर कारमध्ये असणे म्हणजे सुरक्षेची हमी.
जेव्हा कार स्टार्ट होते तेव्हा हे फिचर अॅक्टिव्ह होते. कारचा वेग आणि स्टेअरिंग इनपुटची काळजी घेणे हे त्याचे काम आहे. जेव्हा कार चालवताना चालकाचे लक्ष विचलित होते किंवा त्याचे कारवरील नियंत्रण सुटते, तेव्हा हे फिचर ऑटोमॅटिक कार नियंत्रित करू लागते. त्यामुळे अपघाताचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो.
हे सेफ्टी फिचर ओव्हर-स्टेअरिंग किंवा अंडर-स्टेअरिंग दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक चाकावरील ब्रेक दाब वाढवते किंवा कमी करते आणि इंजिनला पुरवलेली पॉवर देखील कमी करते.
हे देखील वाचा: Maruti Suzuki Swift Blitz एडिशन लॉंच! जाणून घ्या कारची किंमत आणि वैशिष्ट्ये
या सेफ्टी फीचरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अॅक्टिव्ह झाल्यावर आपोआप काम करते. हे स्टेअरिंग योग्य स्थितीत वळत नसताना कार घसरण्यापासून देखील प्रतिबंधित करते. सोप्या शब्दात समजायचे झाल्यास , हे फिचर ड्रायव्हरसाठी एक असिस्टंट म्हणून काम करते आणि अपघात टाळते.