फोटो सौजन्य: iStock
पूर्वी कार विकत घेताना अनेक ग्राहक फक्त कारच्या मायलेज आणि किंमतीवर जास्त लक्ष देत होते. पण आता ही स्थिती बदलली आहे. आजचा ग्राहक कार विकत घेताना सेफ्टी फीचर्सवर सुद्धा लक्ष देत आहे. तसेच कित्येक कार्स सेफ्टी टेस्टमध्ये सुद्धा सहभागी होत असतात.
आजकालच्या कार्समध्ये एक नवीन सेफ्टी फिचर समाविष्ट करण्यात येत आहे. ADAS म्हणजेच अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स असे या सेफ्टी फीचरचे नाव आहे. हा फिचर चालकांना त्यांची कार सुरक्षित आणि आरामात चालवण्यास मदत करतात. तसेच हा फिचर सेन्सर आणि कॅमेरे वापरतो जेणेकरून चालकाचे अडथळे आणि चुका दूर होतील.
कार मालकांनो लक्ष द्या, हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या किंमती झाल्या जाहीर, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
भारतात दरवर्षी वाहन उत्पादक डिझाईन आणि नवीन तंत्रज्ञानासह उत्तम कार लाँच करतात. 2024 मध्येही अशा काही कार आणि एसयूव्ही देशात लाँच झाल्या आहेत. ज्यात ADAS सारख्या सेफ्टी फीचर्ससह आणण्यात आले आहे. 30 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत या सेफ्टी फीचरसह कोणत्या कार या वर्षी लाँच करण्यात आल्या आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया.
जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी Honda ने अलीकडेच आपली कॉम्पॅक्ट सेडान कार Honda Amaze 2024 भारतात लाँच केली आहे. कंपनीने या कारमध्ये ADAS सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत. या सेगमेंटमधील कारमध्ये पहिल्यांदाच हे फीचर देण्यात आले आहे. या फिचरसह, Honda Amaze 2024 ची इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमत 9.70 लाख रुपयांपासून सुरू होते.
Mahindra XUV 3XO एप्रिल 2024 मध्ये महिंद्राने कॉम्पॅक्ट SUV म्हणून लाँच केली आहे. या SUV मध्ये अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स देण्यात आले होते, ज्यात ADAS सारख्या सेफ्टी फीचर्सचा देखील समावेश आहे. या फीचरसह त्याची एक्स-शोरूम किंमत 12.24 लाख रुपयांपासून सुरू होते.
Sonet SUV देखील Kia ने कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये ऑफर केली आहे. या SUV च्या GTX Plus व्हेरियंटमध्ये ADAS देण्यात आले आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 14.82 लाख रुपयांपासून सुरू होते.
Hyundai ने जानेवारी 2024 मध्ये Creta चे फेसलिफ्ट आणले होते. ज्यामध्ये डिझाईन पूर्णपणे बदलून अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले होते. ही SUV देखील ADAS सोबत देण्यात आली होती. या फीचरसह एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 15.98 लाख रुपयांपासून सुरू होते.
दीड लाखाच्या आत असणारी Sports Bike शोधात आहात? ‘या’ आहेत बेस्ट ऑप्शन
14-15 ऑगस्ट 2024 रोजी, महिंद्राने त्यांची थार रॉक्स लाँच केली, जी त्याच्या पॉवरफुल SUV थारची 5 डोअर व्हर्जन आहे. कंपनीच्या या SUV मध्ये ADAS देखील ऑफर करण्यात आली आहे. या फीचरसह ही एसयूव्ही 17 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी केली जाऊ शकते.
याव्यतिरिक्त, Tata Curvv, Hyundai Creta N Line, Hyundai Alcazar Facelift, Tata Curv EV, आणि BYD eMAX7 मध्ये देखील ADAS फिचर देण्यात आले आहे.