फोटो सौजन्य: iStock
देशात बाईक्सची विक्री झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज कित्येक ग्राहक बजेट फ्रेंडली बाईक्सलाच प्राधान्य देताना दिसतात. म्हणूनच कितीतरी कंपन्या नेहमी ग्राहकांच्या बजेटमधील उत्तम बाईक्स ऑफर करतात. पूर्वी बाईक घेताना अनेक जण फक्त मायलेज आणि किंमतीचा विचार करत होते. पण आज ही परिस्थिती बदलली आहे.
आजचा ग्राहक बाईक खरेदी करताना फक्त किंमत किंवा मायलेज पाहत नाही तर बाईकचा लूक सुद्धा ध्यानात ठेवत असतो. त्यातही आजच्या तरुणांमध्ये स्पोर्ट्स बाईक्सची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. पण अनेकदा स्पोर्ट्स बाईक्सच्या किंमती महाग असल्यामुळे त्या विकत घेणं प्रत्येकाला परवडेलच असे नाही. हीच बाब लक्षात घेऊन आज आपण काही Best Budget Friendly Sports Bike बद्दल जाणून घेऊया. या बाईकचे दमदार इंजिन आणि स्पोर्टी लूक लोकांना आकर्षित करतो. यासोबतच या बाईक्स दैनंदिन वापरासाठीही सर्वोत्तम मानल्या जातात. बऱ्याच लोकांना वाटते की स्पोर्ट्स बाईकची किंमत खूप जास्त आहे, परंतु आता ती तशी नाही.
जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; या तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक
बजेट फ्रेंडली स्पोर्ट्स बाईक्समध्ये पहिला सर्वोत्तम पर्याय म्हणजे बजाज पल्सर NS160. या बाईकची सुरुवातीची किंमत 1 लाख 24 हजार रुपये आहे. या बाईकमध्ये 160 सीसी ट्विन स्पार्क आहे. बजाज पल्सर NS160 थेट TVS Apache RTR 160 4V, Hero Xtreme 160R 4V, Yamaha FZ-S Fi v3.0 आणि Suzuki Gixxer शी स्पर्धा करते. या बाईकचे सिंगल-सिलेंडर इंजिन 17 bhp पॉवर आणि 14.6 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
दुसरी स्पोर्ट्स बाईक TVS Apache RTR 160 4V आहे. या TVS बाईकची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 26 हजार रुपये आहे. यात 16cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे 17.4 bhp पॉवर आणि 14.73 चा पीक टॉर्क जनरेट करते. TVS Apache RTR 160 4V मध्ये सेगमेंट-फर्स्ट रॅम एअर कूलिंगची फीचर्स आहेत जी इंजिनमधून निर्माण होणारी उष्णता सुमारे 10 अंशांनी कमी करते. ऑइल-कूलिंगसह, ही बाईक Fi वर 114 किमी प्रतितास आणि कार्ब व्हेरियंटवर 113 किमी प्रतितास इतका वेग प्राप्त करण्यास सक्षम आहे.
Mercedes ची ‘ही’ कार आहे कमाल ! फक्त 30 मिनिटात 10-80% होते चार्ज, ‘या’ दिवशी होणार लाँच
तुमच्याकडे असलेला तिसरा मोठा पर्याय म्हणजे Yamaha FZ-S FI V4, ज्याची राजधानी दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 1 लाख 28 हजार 900 रुपये आहे. या बाईकच्या फीचर्समध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम (TCS), मागील बाजूस सिंगल चॅनेल ABS असलेले डिस्क ब्रेक, मल्टी-फंक्शनल LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, LED हेडलाइट, टायर हगिंग रिअर मडगार्ड, लोअर इंजिन गार्ड आणि ब्लूटूथ इनेबल्ड Y-Connect ॲप सह कनेक्टिव्हिटी मिळते.