फोटो सौजन्य: iStock
जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना महागड्या बाईक प्रचंड आवडतात, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण जगभरातील अशा बाईकबद्दल जाणून घेऊयात ज्या इतक्या महाग आहेत की सामान्य लोकच नाही तर श्रीमंत लोकही त्या खरेदी करण्यापूर्वी कचरतील. या फक्त रायडींग साठी बनवल्या जात नाहीत, तर त्या इंजिनिअरिंगचे उत्तम उदाहरण देखील आहेत. चला, जगातील पाच सर्वात महागड्या बाईक्सबद्दल जाणून घेऊयात, ज्यांच्या किमती वाचून तुमची झोप उडेल.
डुकाटीच्या या बाईकची किंमत सुमारे USD 1,12,000 (सुमारे ₹98.5 लाख) आहे. यात 998cc, 90° डेस्मोसेडिसी स्ट्राडेल R V4, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले असून, यात काउंटर-रोटेटिंग क्रँकशाफ्ट आणि डेस्मोड्रोमिक व्हॉल्वट्रेन तंत्रज्ञान वापरले आहे. हे इंजिन 224 PS ची शक्ती निर्माण करते, तर रेसिंग किटसह त्याची पॉवर 234 PS पर्यंत वाढते. याचप्रमाणे, यात 116 Nm टॉर्क असून रेसिंग किटसह तो 119 Nm पर्यंत मिळतो. या बाईकची टॉप स्पीड 299 kmph आहे.
आम्ही बाईक ऑनलाईनही विकू! Flipkart वर ‘या’ 5 शहरात डिलिव्हर होतील Royal Enfield चे ‘हे’ मॉडेल्स
रायडरच्या सुरक्षेसाठी यात अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामध्ये राइडिंग मोड्स, पॉवर मोड्स, कॉर्नरिंग ABS EVO, डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल (DTC) EVO 2, डुकाटी व्हीली कंट्रोल (DWC) EVO, डुकाटी स्लाईड कंट्रोल (DSC) आणि इंजिन ब्रेक कंट्रोल (EBC) EVO यांचा समावेश आहे.
आर्क व्हेक्टरची किंमत सुमारे GBP 110,000 (अंदाजे ₹1.31 कोटी) पासून सुरू होते. ही जगातील सर्वात टेक्निकलदृष्ट्या प्रगत बाईकपैकी एक आहे. ही एक इलेक्ट्रिक सुपरबाईक आहे, ज्यामध्ये कार्बन फायबर मोनोकोक चेसिस, 16.8 kWh बॅटरी आणि विशेषतः डिझाइन केलेले रायडर गियर आहे. ही बाईक 133 bhp पॉवर जनरेट करते आणि तिचा टॉप स्पीड 200 किमी/तास आहे. ही बाईक अंदाजे 3.1 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी स्पीड वाढवू शकते. एका चार्जवर त्याची रेंज अंदाजे 270-271 मैल आहे आणि फास्ट चार्जिंग वेळ 40 मिनिटे आहे.
कॉम्बॅट मोटर्स रॅथची किंमत सुमारे USD 1,55,000 (सुमारे ₹1.36 कोटी) आहे. या बाईकच्या केवळ 21 युनिट्स तयार करण्यात आल्या आहेत. यात 2,163cc V-twin इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 110.5 PS पॉवर आणि 195 Nm टॉर्क निर्माण करते.
या बाईकसाठी एअरक्राफ्ट-ग्रेड ॲल्युमिनियम मोनोकॉक फ्रेम वापरली आहे जी फ्युएल टॅंकचेही काम करते. यात गर्डर डबल-विशबोन फ्रंट सस्पेन्शन, BST कार्बन फायबर व्हील्स, अनोखा ट्रान्सपेरंट फ्युएल टाकी व एअरबॉक्स, तसेच बेरिंगर ब्रेक्स असे अत्याधुनिक फीचर्स दिलेले आहेत. विशेष म्हणजे, या बाईकमध्ये फेअरिंग नसल्यामुळे तिचा लुक आणखीनच दमदार आणि आकर्षक दिसतो.