फोटो सौजन्य: iStock
आपल्या देशात अनेकांना कार रेसिंग पाहायला खूप आवडते. पूर्वी फक्त या खेळाकडे फक्त एक मनोरंजन म्हणून पाहिले जायचे. मात्र, आज ही परिस्थिती बदलत आहे. आज या खेळाकडे काही जण करिअर म्हणून सुद्धा बघत आहे. त्याचप्रमाणे सरकार देखील या खेळाला प्रोत्साहन देत आहे. जर तुम्ही सुद्धा कार रेसिंग पाहण्यास इच्छुक असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे येत्या डिसेंबर 2025 मध्ये नवी मुंबईत Formula Night Race चे आयोजन करण्यात आले आहे.
अलिकडेच, आरपीपीएल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात एक करार झाला. त्यानंतर, महाराष्ट्राची पहिली फॉर्म्युला नाईट स्ट्रीट रेस नवी मुंबईत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…
करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की, “नवी मुंबई स्ट्रीट रेस ही महाराष्ट्राच्या मोटरस्पोर्ट प्रवासातील ऐतिहासिक टप्पा आहे. हा उपक्रम पर्यटनाला चालना देईल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करेल. जागतिक दर्जाचे असे आयोजन करण्याची आपली क्षमता या माध्यमातून सिद्ध होईल. ही रेस केवळ युवा रेसर्सनाच प्रेरणा देणार नाही, तर अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि इव्हेंट मॅनेजमेंटसारख्या क्षेत्रातील तरुण प्रतिभांना देखील प्रोत्साहन देईल. या उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय मानकांना पूर्ण करणाऱ्या रेससाठी सहकार्य करणाऱ्या आरपीपीएल आणि सर्व शासकीय विभागांचे मी अभिनंदन करतो. जागतिक क्रीडा आणि सांस्कृतिक सोहळ्यांचे केंद्रस्थान म्हणून महाराष्ट्र उदयास आणण्याच्या आपल्या दृष्टिकोनातील हा एक महत्त्वाचा भाग आहे.”
ही रेस नवी मुंबईतील पाम बीच रोडवरून सुरू होऊन बुलेवार्डमार्गे नेरुळ तलावापर्यंत जाणार आहे. यासाठी 3.7 किलोमीटर लांबीचा विशेष सर्किट तयार केला जाणार असून त्यात 14 आव्हानात्मक वळणे असतील. या ट्रॅकवरूनच चालकांच्या कौशल्याची खरी कसोटी लागणार आहे.
आयोजकांनी नुकतेच करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यांनी रेसची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, ती डिसेंबरमध्ये होईल अशी शक्यता आहे.
या स्पर्धेत एकूण सहा टीम्स सहभागी होतील: गोवा एसेस जेए रेसिंग, स्पीड डेमन्स दिल्ली, कोलकाता रॉयल टायगर्स, किच्चा किंग्ज बेंगळुरू, हैदराबाद ब्लॅकबर्ड्स आणि चेन्नई टर्बो रायडर्स. यातील बहुतेक संघ बॉलीवूड स्टार्सच्या मालकीचे आहेत.