
फोटो सौजन्य: iStock
भारतामध्ये टोयोटा कंपनीकडून विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. कंपनीकडून उद्या अधिकृतपणे नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीचे लाँचिंग करण्यात येणार आहे. टोयोटाच्या या नव्या इलेक्ट्रिक कारमध्ये कोणते फीचर्स मिळू शकतात, किती क्षमतेची बॅटरी आणि मोटर देण्यात येऊ शकते तसेच ही एसयूव्ही कोणत्या किमतीत लाँच होऊ शकते, याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
टोयोटाकडून भारतात उद्या अधिकृतपणे नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केली जाणार आहे. ही टोयोटाची देशातील पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही असणार असून, यात आधुनिक आणि प्रीमियम फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे.
फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक
सध्या कंपनीने या एसयूव्हीचा केवळ टीझर जारी केला असून, अधिकृत तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र अंदाजानुसार, या गाडीत मारुती ई-विटाराप्रमाणेच 49 kWh आणि 61 kWh असे दोन बॅटरी पर्याय दिले जाऊ शकतात. यामुळे या एसयूव्हीला सुमारे 500 ते 543 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये अनेक प्रगत फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये 10.25 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, 10.1 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी लाइट्स, पॅनोरमिक सनरूफ, ड्युअल-टोन इंटिरिअर, सात एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, ADAS तंत्रज्ञान आणि 18 इंच अलॉय व्हील्स यांचा समावेश असू शकतो.
कंपनीकडून अधिकृत लाँचनंतरच या एसयूव्हीच्या किमतीची घोषणा केली जाईल. मात्र अंदाजानुसार, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 17 ते 20 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत बाजारात दाखल होऊ शकते.
टोयोटाची ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच झाल्यानंतर MG Windsor EV, Hyundai Creta Electric, Maruti eVitara आणि Tata Curvv EV या इलेक्ट्रिक एसयूव्हींशी थेट स्पर्धा करणार आहे.