फोटो सौजन्य: Freepik
आधी एक काळ होता जेव्हा बुलडोझर आपल्याकडे एखादी अवैध बिल्डिंग तोडण्यात किंवा रस्त्याची खुदाई करण्यात वापरले जायचे. पण आता तर निवडणुकीच्या गुलालात सुद्धा बुलोडोझर वापरला जातो. मग ते त्यावर विजयचा गुलाल उधळणे असो, की त्यावर उभे राहून जल्लोष करणे असो. दिवसेंदिवस बुलडोझरची क्रेझ ही वाढत चालली आहे.
यासर्व घडामोडीत एक प्रश्न असा ही पडतो की, हा बुलडोझर ज्याला आपण JCB असे सुद्धा म्हणतो तो कितीचा मायलेज देतो? चला जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर.
बुलडोझरचे मायलेज अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की त्याचा आकार, इंजिन क्षमता, कामाचा प्रकार आणि वापराच्या परिस्थिती. साधारणपणे, बुलडोझर हे जड उपकरणे असते, जे भरपूर इंधन वापरते. सरासरी, मोठ्या बुलडोझरचा इंधन वापर सुमारे 10 ते 20 लिटर प्रति तास असू शकतो. परंतु बुलडोझरचा प्रकार आणि कामाचे स्वरूप यावरून हा आकडा बदलू सुद्धा शकतो.
बुलडोझरची किंमत ही पुढील बाबींवर अवलंबून असते.
ब्रँड: कॅटरपिलर, जेसीबी, कोमात्सु इ. वेगवेगळ्या ब्रँडच्या बुलडोझरच्या किमती वेगवेगळ्या असतात.
मॉडेल्स: प्रत्येक ब्रँडमध्ये अनेक मॉडेल्स असतात, ज्यांच्या क्षमता आणि वैशिष्ट्ये भिन्न असतात.
इंजिन आकार आणि शक्ती: मोठ्या आणि अधिक शक्तिशाली इंजिनांसह बुलडोझर अधिक महाग आहेत.
अटॅचमेंट: बुलडोझरसह येणारी अटॅचमेंट, जसे की रिपर, ब्लेड इत्यादींचा देखील किंमतीवर परिणाम होत असतो.
उत्पादन वर्ष: नवीन मॉडेल्सची किंमत जुन्या मॉडेलपेक्षा जास्त आहे.
भारतात बुलडोझरची किंमत सुमारे 35 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.