• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • 21 Genarations Of Siddi Ruled On Janjira Fort Nrsr

अजेय जलदुर्ग!

जंजिऱ्यावर इ.स. १६१७ पासून सिद्दी अंबर याने बादशाहकडून स्वतंत्र सनद जहागिरी प्राप्त केली. सिद्दी अंबर हा जंजिरा संस्थांचा मूळ पुरुष समजल्या जातो. सिद्दी हा समाज भारतातला नाही तर आफ्रिकेतल्या अबिसीनिया प्रांतातला असून हे लोक शरीराने दणकट मजबूत, काटक आणि शूर दर्यावर्दी होते. सतत पाण्यासोबत खेळणारे होते. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हा बुलंद जंजिरा किल्ला लढवून ३३० वर्षपर्यंत अजिंक्य ठेवला.

  • By साधना
Updated On: Jul 02, 2023 | 06:00 AM
अजेय जलदुर्ग!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोकणातल्या दिवेआगरपासून जंजिर्‍यापर्यंतचा मार्ग आमच्यासाठी नवीन होता. या ऐतिहासिक अशा स्थळाला पर्यटक आवर्जून भेट देतात आणि समुद्री प्रवासाचा आनंद लुटतात. तसे बघितले तर मुरुड, दंडा राजपुरी आणि दिघी येथूनसुद्धा जंजिर्‍याला जाता येते. दिवेआगरपासून केवळ १६ किलोमीटरवर असलेले ‘दिघी’ हे नैसर्गिक गाव आणि या गावात असलेली समुद्रावरची ‘जेट्टी’ म्हणजे फेरीबोटचे पाण्यातले रमणीय स्टेशनच. येथून सुरू होतो शानदार ‘दिघी क्वीन’ या बोटीमधून जंजिर्‍याचा एका तासाचा निळ्याशार पाण्यातला विलोभनीय समुद्री प्रवास. या जेट्टीवर ‘दर्शन लाँच’ व फेरीबोटची सेवा आगरदांडा गावात वाहने नेण्याकरिता सतत उपलब्ध असते. हा परिसर अत्यंत स्वच्छ असून फारशी गर्दी या मार्गावर नसतेच. त्यामुळे अतिशय शांतपणे मनसोक्त समुद्र पर्यटनाचा आनंद दिघीपासून घेता येतो. जवळपास एका तासात आम्हाला मजबूत असा अंगदासारखा पाय रोवून बसलेला काळाकभिन्न जंजिरा दुरून दिसायला लागला. विलोभनीय बुरूजांचे दर्शन झाले. शिडाच्या लहान होड्यांमधून किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि भव्य अशा मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. येथे दिसायला लागला समुद्रातला एक अज्ञात प्राचीन इतिहास.

सहजच मनात विचार आला समुद्रातल्या या २२ एकरच्या बेटावर हा अभेद्य किल्ला कसा बांधला असेल? इथल्या पायरीच्या प्रत्येक दगडाच्या इतिहासाच्या पाऊलखुणा दडलेल्या आहेत.उद्ध्वस्त कमानी आपल्या शौर्याच्या गाथा सांगत आहे. जीर्ण झालेला पडित महाल आपल्या कर्मावर आसवे गाळीत आहे. तरीही कलाल बांगडी, लांडाकासम, चावरी या तोफा आपल्या किल्ल्याचा प्राचीन इतिहास सांगायला आसुसलेल्या असतात.

जंजिरा हा शब्द ‘जझीरा’ या अरबी भाषेतून आलेला आहे. याचा अर्थ ‘बेट’ अथवा समुद्रावरचे ‘बंदर’असा आहे. समुद्रावरच्या या खुल्या बेटाजवळ असलेल्या ‘राजपूर’ या गावाला कोळ्यांची मोठी वस्ती होती. साहजिकच मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. परंतु, त्या काळात समुद्रीचाचे म्हणजे लुटारूंच्या टोळ्या कोळी समाजाला या खुल्या बेटावरून खूप त्रास द्यायचा. त्यांचा उपद्रव व्हायचा व आक्रमण करून माल लुटून न्यायचे. या चाच्यांना प्रतिबंध करण्याकरिता अहमदनगर सल्तनतच्या निजामाच्या ठाणेदाराची परवानगी घेऊन राजा रामराव पाटील या राजपूरच्या कोळ्याच्या नायकाने या बेटावर लाकडी ओंडक्यांची तटबंदी सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात उभारली. या लाकडी तटबंदीला मेढेकोट म्हणत. या कोळ्यांच्या राजा रामराव पाटलाला ‘जंजिर्‍याचा राजा’ म्हणायचे. मग हे पुर्णपणे सुरक्षित बेट ताब्यात आल्यानंतर हा राम पाटील त्या ठाणेदाराला जुमेनासा झाला. राम पाटलाचा बंदोबस्त करण्याकरिता मग पिरमखान याची नियुक्ती ठाणेदाराने केली. संधीसाधून पिरमखानने या बेटावर आक्रमण केले आणि हे जंजिरा बेट ताब्यात घेतले. राम पाटलासह रात्रीच्या भयाण अंधारात या समुद्री बेटावर सर्वांची कत्तल केली आणि मेढेकोट आपल्या ताब्यात घेतले. पिरमखानची कारकीर्द १५२६ ते १५३२ पर्यंत होती आणि तो १५३२ला मरण पावला. कालांतराने बुरहाणखानची नियुक्ती झाली. पण लाकडी मेढेकोट पाण्याने झिजत असल्याचे बघून मजबूत दगडी कोट बांधण्याची परवानगी बुरहानखानने निजामाकडुन मिळवली. १५६७ ते १५७१ ला हा आताचा दगडी कोट बांधला, याला किल्ले मेहरुब म्हणायचे. १६१७ ला सिद्दीचे भारतात आगमन झाले. शिवाजी महाराजांचा जन्म १६३० ला झालेला आहे. आताचे जे संपूर्ण दगडी कोटाचे बांधकाम आपल्याला दिसते ते बुरहानखानने बांधलेले आहे. या जंजिर्‍यावर मग इ.स. १६१७ पासून सिद्दी अंबर याने बादशाहकडून स्वतंत्र सनद जहागिरी प्राप्त केली. सिद्दी अंबर हा जंजिरा संस्थांचा मूळ पुरुष समजल्या जातो. सिद्दी हा समाज भारतातला नाही तर आफ्रिकेतल्या ॲबिसीनिया प्रांतातला असून हे लोक शरीराने दणकट मजबूत, काटक आणि शूर दर्यावर्दी होते. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हा बुलंद जंजिरा किल्ला लढवून ३३० वर्षापर्यंत अजिंक्य ठेवला. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी मिळून हा जंजिरा जिंकण्याकरिता येथून चार किलोमीटरवर समुद्रातच ‘पद्मदुर्ग’ (कासा फोर्ट) हा किल्ला बांधला; पण जंजिरा जिंकता आला नाही. या भिंतीची ऊंची ४० फुटांपेक्षा जास्त असून याला १९ कमानी आहेत. बरेचवेळा कमानीतून वाकून जावे लागते. या किल्ल्याच्या आतमध्ये अनेक उद्ध्वस्त जर्जर झालेल्या अनेक इमारती, मशिदी, राजवाडा, राण्यांचे स्नानगृह, पाणीपुरवठा करणारे प्राचीन स्त्रोत, गोड पाण्याची विहीर, दोन मोठे षटकोनी तलाव, चार मोठे हौद, ‘सदर’ या लहान किल्ल्यावरचा तिरंगा हे सर्व बघायला मिळते. प्रवेश द्वाराजवळच एका वाघाने पाच हत्तींना पायाखाली चिरडल्याचे पराक्रमी इशारा देणारे दगडी शिल्प, पहारेकर्‍यांची देवडी, घोड्यांच्या पागा, जहाज नांगर, पीर पंचायतन आणि सुरूलखानचा श्रीमंती भोगलेला उघड्या खिडक्या असलेला तीन मजली उद्ध्वस्त पडका वाडा बघायला मिळतो. शहा बाबाचा मकबरासुद्धा येथे बघायला मिळतो. पूर्वाभिमुख प्रवेशद्वार असलेल्या या किल्ल्यांवर एकूण २१ सिद्दींनी राज्य केले आणि १६१७ ते १९४७ पर्यंत म्हणजे ३३० वर्षे हा बुलंद किल्ला अभेद्य ठेवला. आज या किल्ल्याला ४०४ वर्षे पूर्ण होत आहेत.

समुद्रसपाटीपासून ९० फुट उंच व २० फुट खोल पाया असलेला हा किल्ला बांधायला सिद्दीला संपूर्ण २२ वर्षे लागली आणि संरक्षणाकरिता बावीस एकरात ५१४ बुरुजांसह २२ सुरक्षा चौक्या उभारल्या व या आताही बघायला मिळतात. ब्रिटिश, पोर्तुगाल, इंग्रज, मुघल, मराठा आणि अनेकांना हा किल्ला कधीच जिंकता आला नाही हे या किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. राजा रामराव पाटील हा जंजिर्‍याचा ‘पहिला राजा’ तर ‘सिद्दी अंबर’ हा पहिला सिद्दी वंशजांचा मूळ पुरुष. भारतीय गणराज्यात जंजिरा संस्थान विलीन होत असताना शेवटचा म्हणजे एकविसावा सिद्दी होता ‘मुहम्मदखान’. सिद्दी वंशजांनी हा बुलंद ‘जंजिरा जलदुर्ग’ शेवटपर्यंत अजिंक्य व अभेद्य ठेवला. एकेका अज्ञात स्थळांचा कसकसा इतिहास असतो हे बघून मन सुन्न झाले. असा हा समुद्रातला अजेय जलदुर्ग ..! २१ सिद्दींचा बुलंद जंजिरा..!

-श्रीकांत पवनीकर
sppshrikant81@gmail.com

Web Title: 21 genarations of siddi ruled on janjira fort nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • Janjira Fort
  • Murud-Janjira

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पचा अहंकार येतो नेहमी आडवा; अमेरिकेनेही वाचावा भारताच्या कुटनीतीचा पाढा

डोनाल्ड ट्रम्पचा अहंकार येतो नेहमी आडवा; अमेरिकेनेही वाचावा भारताच्या कुटनीतीचा पाढा

Jan 10, 2026 | 01:15 AM
MI vs RCB WPL 2026 Highlights: डि क्लर्कने शेवटच्या चेंडूवर मारला चौकार! RCB चा रोमांचक विजय

MI vs RCB WPL 2026 Highlights: डि क्लर्कने शेवटच्या चेंडूवर मारला चौकार! RCB चा रोमांचक विजय

Jan 09, 2026 | 11:48 PM
Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी

Jan 09, 2026 | 11:15 PM
Secret For Longer Life: पुरुषांपेक्षा महिला का होतात दीर्घायुष्य? Harvard ने दिले 5 उपाय, पुरूषही जगतील 100 वर्ष

Secret For Longer Life: पुरुषांपेक्षा महिला का होतात दीर्घायुष्य? Harvard ने दिले 5 उपाय, पुरूषही जगतील 100 वर्ष

Jan 09, 2026 | 10:42 PM
iPhone 17 vs Galaxy S25 Ultra: Apple की Samsung? परफॉर्मन्स, कॅमेरा आणि फीचर्समध्ये कोण मारतंय बाजी?

iPhone 17 vs Galaxy S25 Ultra: Apple की Samsung? परफॉर्मन्स, कॅमेरा आणि फीचर्समध्ये कोण मारतंय बाजी?

Jan 09, 2026 | 10:24 PM
Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Jan 09, 2026 | 10:08 PM
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किती शिकल्या आहेत? जाणून घ्या राजकारणापर्यंतचा त्यांचा थक्क करणारा प्रवास

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किती शिकल्या आहेत? जाणून घ्या राजकारणापर्यंतचा त्यांचा थक्क करणारा प्रवास

Jan 09, 2026 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.