मेक्सिको हादरलं! El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुण बनला नवा ड्रग माफिया? VIDEO जारी करत दिला संदेश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, एल योगर्ट असे या 29 वर्षीय तरुणाचे नाव असून त्याने स्वत:ला कार्टेलचा नवा प्रमुख घोषित केले आहे. यामुळे खळबळ माजली आहे. सध्या एल मेंचोच्या मृत्यूनंतर कार्टेच्या सत्तेसाठी संघर्ष सुरु झाला आहे. मात्र या तरुणाने स्वत:ला कार्टेलचा नेता घोषित करताचा भडका उडाला आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, एल योगर्ट हा एल मेंचोपेक्षाही क्रूर मानला जातो. तो कोलंबियामध्ये माजी सैनिक अधिकारी होती मात्र पुढे जाऊन त्याने ड्रग युनिट चालवायला सुरुवात केली.
सध्या एल योगर्टच्या मृत्यूनंतर न्यू जनरेशनच्या कार्टेलमध्ये खळबळ माजली आहे. एल मेंचोचा मुलगा एल मेंचिटो आणि कार्टेलमधील काही जुने नेते एल आर3, एल जार्डिनारो यांनी एल योगर्टला आव्हान दिले आहे. सध्या कार्टेमधील दहशतवाद्याच्या वादामुळे मेक्सिकोत अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे मेक्सिकोत मोठ्या गँगवॉरचा भडका उडण्याची शक्यत आहे. देशभरात हिंसाचाराचे सावट उभे राहिले असून परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
एल मेंचोचा मृत्यू मेक्सिकोसाठी मोठा विजय मानला जात आहे. मात्र त्याच्या मृत्यूने ड्रग माफियांच्या दुनियेत खळबळ माजली असून देशभरात हिंसाचार उफळला आहे. ठिकठिकाणी जाळफोळ आणि स्फोट घडवून आणले जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच वेळी मेक्सिकोच्या राष्ट्रपती शीनबॉम यांनी राष्ट्राल संबोधित करत, देशात सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे. मेक्सिकोच्या लोकांसाठी शांतता प्रस्थापित करणे पहिले प्राधान्य राहिले असे त्यांनी म्हटले आहे.
🚨The new boss of the Jalisco Cartel is a 29-year-old nicknamed “El Yogurt” who led El Mencho’s personal death squad He survived a Mexican Navy raid last year and is reportedly more brutal than his predecessor, local media reported. pic.twitter.com/MlfL93ptoN — Sputnik (@SputnikInt) February 24, 2026






