File Photo PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवशीय रशिया दौऱ्यावर आहेत. राजधानी मॉस्कोमध्ये पोचताच त्यांचे रशियन राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी जोरदार स्वागत केले आहे. अशातच रशियामध्ये असलेल्या भारतीय समुदायामध्ये पोचताच पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे की, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात कशा पद्धतीने अंक ३ हा केंद्रबिंदू असणार आहे. विशेष म्हणजे सरकारच्या सर्वच लक्ष्यांमध्ये त्याच्या प्रभाव दिसून येणार आहे. देशातील गरिबांसाठी ३ कोटी घरे बनवणे असो किंवा मग देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे असो. अशा सर्वच बाबींमध्ये ३ अंकांची झलक पाहायला मिळणार आहे.
Modi 3.0 मध्ये अंक ३ ची कमाल
रशियातील भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाला तीनपट वेगाने काम करण्याबाबत ध्येय निश्चित करण्यात आले आहे. १० वर्षांपूर्वी देशात जेव्हा स्टार्टअप्सची संख्या शेकडोमध्ये होती. ती आज लाखोंच्या संख्येत पोहचली आहे. ज्यामुळे सध्या भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून समोर आला आहे. त्यांनी म्हटले आहे की भारतीय तरुणांमध्ये असलेली पॉवर आणि टॅलेंट पाहून जगभरातील देशांच्या भुवया उंचावत आहे. याशिवाय मागील दहा वर्षातील सरकारची काम करण्याची गती पाहता, विदेशातून भारतात येणारे लोक भारत बदलत आहे, हे वाक्य उच्चारत आहे.
(फोटो सौजन्य : ‘एक्स’ अकाउंट)
काय आहेत सरकारची लक्ष्य
आपल्या Modi 3.0 कार्यकाळामध्ये सरकारच्या असलेल्या योजनेबाबत नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, मी देशाचा पंतप्रधान म्ह्णून तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. त्यामुळे आता तीनपट वेगाने काम करण्याचे सरकारचे लक्ष्य असणार आहे. याशिवाय देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहे. देशातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी लखपती दीदी योजनेद्वारे तीन कोटी महिलांना रोजगार मिळवून देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. ज्यामुळे महिलांना वार्षिक १ लाखाहून अधिक मानधन मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय सरकारकडून तीन कोटी गरिबांना घरे बांधून दिली जाणार आहे.
मागील १० वर्ष केवळ ट्रेलर होती
पंतप्रधान मोदी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, मागील १० वर्षांपासून सरकार केवळ आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर देत नाहीये. तर सरकारकडून देशातील गरीब कुटुंबांना ५ लाख रुपयेपर्यंतचे उपचार देशभरातील हॉस्पिटलमध्ये मोफत दिले जात आहे. आपल्या सरकारची मागील १० वर्ष ही केवळ ट्रेलर होती. मात्र, येणारी पुढील १० वर्ष ही देशाच्या विकासामध्ये तेजीने वाढ होणार आहे.