Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती! ‘JSW Motors’ या दिवाळीत सुरू करणार प्रत्यक्ष उत्पादन; ‘ही’ असणार पहिली कार

छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीनमध्ये ५५० एकरवर पसरलेल्या 'जेएसडब्ल्यू मोटर्स'च्या प्लांटमध्ये या दिवाळीत कारचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे. कंपनीची पहिली कार 'जेटूर टि २' ची किंमत आणि सविस्तर प्लॅनिंग वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 01, 2026 | 05:12 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती! 'JSW Motors' या दिवाळीत सुरू करणार प्रत्यक्ष उत्पादन (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती! 'JSW Motors' या दिवाळीत सुरू करणार प्रत्यक्ष उत्पादन (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती!
  • ‘JSW Motors’ या दिवाळीत सुरू करणार प्रत्यक्ष उत्पादन
  • ‘ही’ असणार पहिली कार
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी): शहरातील उद्योग जगताला (Industrial Sector) एक नवी आणि मोठी दिशा देणाऱ्या ‘जेएसडब्ल्यू मोटर्स’ने (JSW Motors) आपल्या प्लांटमधील प्रत्यक्ष वाहन उत्पादनाचा कालावधी अधिकृतपणे जाहीर केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या दिवाळी २०२६ पर्यंत प्लांटमध्ये कारचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर २०२६ पासून नव्या कारची बुकिंग सुरू केली जाईल, तर डिसेंबर २०२६ किंवा जानेवारी २०२७ च्या सुरुवातीला या गाड्यांची प्रत्यक्ष विक्री बाजारात सुरू होणार आहे. जेएसडब्ल्यूच्या या घोषणेमुळे मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रात अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील दोन वर्षांत छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक हालचालींना कमालीचा वेग आला आहे. ऑरिक सिटी (AURIC City) आणि बिडकीन परिसरात एथर (Ather Energy), पिरामल फार्मा (Piramal Pharma) आणि टोयोटा किर्लोस्कर (Toyota Kirloskar) यांसारख्या अनेक बड्या जागतिक कंपन्यांनी आपल्या भव्य प्रकल्पांच्या उभारणीचे काम सुरू केले आहे. यामध्ये आता इव्ही (EV) कार निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या ‘जेएसडब्ल्यू’ची भर पडल्याने शहराचे नाव ऑटोमोबाईल हब म्हणून जागतिक नकाशावर झळकणार आहे.

बिडकीनमध्ये ५५० एकर क्षेत्रात भव्य प्लांट सज्ज

कंपनीने व्यावसायिक उत्पादनाच्या दृष्टीने आपल्या कामाला मोठी गती दिली आहे. बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल ५५० एकर विस्तीर्ण जागेवर जेएसडब्ल्यू आपला भव्य मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारत आहे. या प्लांटच्या उभारणीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या विश्वासनीय माहितीनुसार, जेएसडब्ल्यूने चीनमधील नामांकित ‘चेरी’ (Chery) कंपनीसोबत मोठी भागीदारी केली आहे. त्यांच्या सहकार्याने संभाजीनगरच्या या प्लांटमध्ये कारची असेंब्ली केली जाणार आहे. नोव्हेंबर २०२६ पासून एनईव्ही (New Energy Vehicle – NEV) चे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू होईल. या कारसाठी प्रगत चिनी तंत्रज्ञानाचा (Chinese Technology) वापर करण्यात आला आहे.

Home Loan, Car Loan लवकर संपवावे की Mutual Fund मध्ये SIP करावी? पर्सनल फायनान्सचा ‘हा’ सुवर्ण नियम जाणून घ्या

३.५ लाखांचे पहिले प्रीमियम मॉडेल; पुढील नियोजनही तयार

सूत्रांच्या माहितीनुसार, जेएसडब्ल्यू कंपनीकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्पादित होणारे पहिले मॉडेल ‘जेटूर टि २’ (Jetour T2) असणार आहे. या प्रीमियम कारची किंमत ३५ लाख रुपयांच्या आसपास किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे. या दिवाळीत उत्पादन सुरू झाल्यावर, नोव्हेंबरपासून देशभरात याची बुकिंग विंडो उघडेल. हे मॉडेल केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही निर्यात (Export) केले जाणार आहे. या पहिल्या मॉडेलनंतर सामान्य ग्राहकांसाठी कंपनीचे दुसरे मॉडेल अंदाजे १८ ते २० लाख रुपये किमतीचे असू शकते. याशिवाय, आगामी काळात आणखी दोन ते तीन नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत उतरवण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे.

प्रतितास ६० गाड्यांचे उत्पादन करण्याचे लक्ष्य

बिडकीन येथील या प्लांटमध्ये आधुनिक रोबोटिक्स आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या प्लांटमधून दर तासाला ६० कार बनतील, अशी भक्कम योजना कंपनीने आखली आहे. वर्षाला सुमारे ५ लाख युनिट्सचे उत्पादन करून भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे मार्केट काबीज करण्याचे उद्दिष्ट जेएसडब्ल्यू मोटर्सने ठेवले आहे. यामुळे स्थानिक पातळीवर हजारो तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

पूर्वजांचे पैसे बँक किंवा विम्यात तसेच पडून आहेत? ‘अशी’ ट्रान्सफर करा बँक खात्यात हक्काची रक्कम

Web Title: A revolution in chhatrapati sambhajinagar jsw motors to commence actual production this diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • auto news
  • Business News
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

CJP Protest: आंदोलन जंतर-मंतरवर, फटका खिशाला! Ola, Uber, Rapido चे दर दुप्पट; मेट्रो स्टेशन बंद असल्याने दिल्लीत खोळंबा
1

CJP Protest: आंदोलन जंतर-मंतरवर, फटका खिशाला! Ola, Uber, Rapido चे दर दुप्पट; मेट्रो स्टेशन बंद असल्याने दिल्लीत खोळंबा

ताबा मिळून 6 वर्षे झाली तरी क्लबहाऊसचं बांधकाम पूर्ण नाहीच! MahaRERA चा बिल्डरला मोठा दणका, पैसे रिफंड करण्याचे आदेश
2

ताबा मिळून 6 वर्षे झाली तरी क्लबहाऊसचं बांधकाम पूर्ण नाहीच! MahaRERA चा बिल्डरला मोठा दणका, पैसे रिफंड करण्याचे आदेश

Infosys Share Price: नव्या बॉसच्या एन्ट्रीने इन्फोसिसला धक्का! शेअर्समध्ये मोठी पडझड, गुंतवणूकदारांचं नुकसान; काय आहे कारण?
3

Infosys Share Price: नव्या बॉसच्या एन्ट्रीने इन्फोसिसला धक्का! शेअर्समध्ये मोठी पडझड, गुंतवणूकदारांचं नुकसान; काय आहे कारण?

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PM Kisan योजनेच्या 24 व्या हफ्त्याबाबत आली सूचना, हे काम लवकर करा, नाहीतर अडकतील पैसे
4

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PM Kisan योजनेच्या 24 व्या हफ्त्याबाबत आली सूचना, हे काम लवकर करा, नाहीतर अडकतील पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.