आधार हाऊसिंग फायनान्सने UM आणि नफ्यात २०% पेक्षा अधिक वाढ नोंदवली; कमी उत्पन्न घरांसाठी वचनबद्धता केली मजबूत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मुंबई, जानेवारी ३१, २०२६: आधार हाऊसिंग फायनान्स लि.ने ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्त झालेली तिमाही आणि नऊमाहीठी त्यांच्या लेखापरीक्षित न केलेल्या आर्थिक निकालांची घोषणा केली. कंपनीच्या नऊ महिन्यांमधील उत्तम कामगिरीमुळे या वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेला एयूएम आणि नफाबाबत उद्दीष्टे संपादित करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.
आर्थिक कामगिरीची प्रमुख वैशिष्ट्ये :
तपशील
9M FY26
9M FY26
वाढ (टक्केवारी)
Q3 FY26
Q3 FY25
वाढ (टक्केवारी)
ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट (AUM) (कोटी रूपये)
28,790
23,976
20%
28,790
23,976
20%
वितरण (कोटी रूपये)
6,469
5,626
15%
2,380
2,094
14%
करोत्तर नफा (PAT) (कोटी रूपये)
797*
667
20%
294*
239
23%
निव्वळ मूल्य (कोटी रूपये)
7,185
6,114
18%
7,185
6,114
18%
आरओए (टक्के)
4.4%*
4.3%
+ 4 bps
4.6%*
4.4%
+ 21 bps
आरओई (टक्के)
15.6%*
16.8%**
– 115 bps
16.5%*
15.8%
+ 70 bps
एयूएमवर जीएनपीए (टक्के)
1.38%
1.36%
+ 2 bps
1.38%
1.36%
+ 2 bps
यामध्ये मे २०२४ मध्ये केलेल्या १००० कोटी रूपयांच्या प्राथमिक गुंतवणूकीच्या कमी आधारभूत परिणामाचा समावेश आहे.
कामगिरीची वैशिष्ट्ये – Q3 आणि 9M FY26
“आधार हाऊसिंग फायनान्सने आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत उत्तम विकास गती कायम राखली आहे, ज्यासह अल्प-उत्पन्न गृहनिर्माण वित्तपुरवठा विभागातील आमचे नेतृत्व अधिक दृढ झाले आहे. आमच्या धोरणात्मक ‘अर्बन अँड इमर्जिंग’ शाखा मॉडेलने उत्तम कामगिरी करणे सुरू ठेवले आहे, ज्यासह आम्ही वंचितांना सेवा देण्यासाठी 621 हून अधिक शाखांमध्ये आमची उपस्थिती अधिक वाढवली आहे. आमचा एयूएम ३१ डिसेंबर २०२५ रोजी 28,790 कोटी रूपये राहिला, ज्यामध्ये वार्षिक 20% वाढ झाली. आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीसाठी करोत्तर नफा वार्षिक 20% वाढीसह 797* कोटी रूपयांपर्यंत पोहोचला.
सध्याच्या सूक्ष्म आर्थिक क्षेत्रात अल्प-उत्पन्न गृहनिर्माण विभागासाठी मोठी संधी आहे, ज्याला जीएसटी २.० धोरणाच्या फायद्यांचे पाठबळ मिळेल, ज्यामुळे डेव्हलपर्ससाठी बांधकामाचा खर्च कमी होईल. यासह आम्ही २०२६ मध्ये वाटचाल करत असताना गृहनिर्माण बाजारपेठेला उत्तम संधी आहे. आम्हाला आमच्या विभागात स्थिर ग्राहक भावनेची अपेक्षा आहे.”
प्रधान मंत्री आवाज योजना (पीएमएवाय) २.० स्किम अल्प उत्पन्न/किफायतशीर गृहनिर्माण विभागामध्ये मागणीला चालना देण्यामध्ये सहाय्यक भूमिका बजावत आहे. पीएमएवाय २.० अंतर्गत 10,000 हून अधिक ग्राहकांना आधीच व्याजावरील अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला आहे. पीएमएवाय २.० अंतर्गत व्याजावरील अनुदान उपलब्धतेमुळे विशेषत: ईडब्ल्यूएस व एलआयजी विभागांमधील पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी घर घेणे सोपे झाले आहे. ग्राहकांमध्ये जागरूकतेचा अधिक प्रसार, किफायतशीर गृहनिर्माण विभागामध्ये वितरणामध्ये वाढ यांमुळे आम्हाला या योजनेला अधिकाधिक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
भविष्याकडे वाटचाल करत आधार आपले डिजिटल-केंद्रित ऑपरेटिंग मॉडेल विकसित करण्याप्रती कटिबद्ध आहे, ज्यासाठी एआयचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यापर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण उद्योगामध्ये अवलंब करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. एआय-केंद्रित अंडररायटिंग को-पायलट्सना एकत्र करत आणि कर्जदारांच्या माहितीचा फायदा घेत आम्ही प्रक्रिया, प्रशासन व जोखीम व्यवस्थापनामध्ये सुधारणा करत आहोत. आम्ही अल्प-उत्पन्न गटामधील कुटुंबांसाठी घर खरेदी करणे सोपे करण्यावर आणि भारतभरात शाश्वत आर्थिक समावेशनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.






