फोटो सौजन्य - Social Media
बुधवारी झालेल्या विमान अपघातात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आणि महाराष्ट्राचा एक राज कारणी हिरा हरपला. तीन दिवसांसाठी राज्यात दुखवटा पाळण्यात आला, सर्व शासकीय कार्यालयांवर झेंडा अर्ध्यावर फडकवण्यात आला. अशामध्ये अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. शनिवारी, त्यांची शपथविधी पार पडली तसेच खासदारकीचा राजीनामाही दिला.
महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे शिक्षण काय?
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या माजी राज्य मंत्री तसेच लोकसभेचे सदस्य पदमसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यात बाजीराव पाटलांच्या घरी झाला. सुनेत्रा पवार उच्चशिक्षित असून त्या उत्तम समाजसेविका आहेत. सुनेत्रा पवार यांनी SB कॉलेज, औरंगाबाद येथून वाणिज्य शाखेत B.Com पदवी (Bachelor of Commerce) पूर्ण केली आहे. त्यांनी आपल्या कॉमर्स शिक्षणाचा वापर करून बारामती हाई-टेक टेक्सटाइल पार्क सारख्या औद्योगिक प्रकल्पांचे व्यवस्थापन केले आहे आणि उत्पादन, गुंतवणूक व रोजगार निर्मिती यांसारख्या बाबींमध्ये निर्णय-घेण्याची जबाबदारी सांभाळली आहे.
सुनेत्रा पवार विद्या प्रतिष्ठान या मोठ्या शैक्षणिक समूहाच्या ट्रस्टी आहेत, ज्यात सुमारे 25,000 विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि प्रशासनाचे काम चालते. त्यांनी Environmental Forum of India (EFOI) ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे, जी पर्यावरण संरक्षण, जैवविविधता आणि शाश्वत कृषी यांवर काम करते. सुनेत्रा पवार हे World Entrepreneurship Forum (फ्रान्स) या जागतिक मंचावरही विचारवंत सदस्य म्हणून काम करत आहेत.
2024 मध्ये बारामती लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष राजकीय कारकीर्द सुरू केली आणि नंतर महाराष्ट्रासाठी राज्यसभेत निवडून दिले गेले. सुनेत्रा पवार यांचे शिक्षण B.Com आहे, आणि त्यांनी शिक्षण, उद्योग, शाश्वत विकास आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे शिक्षण काय?
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे शिक्षण दहावी आहे. तरीही त्यांनी अनुभवाने महाराष्ट्राचे एकूण सहावेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.






