(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीचा सीझन ६ गेल्या तीन आठवड्यांपासून गेम चांगलाच रंगला होता. गेल्या आठवड्यात या सीझनचा पहिला एलिमिनेशन पार पडलं. या एलिमिनेशनमध्ये प्रसिद्ध लावणी डान्सर राधा पाटील हिनं बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला. आता तिसऱ्या आठवड्यात एकूण आठ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत, रूचिता जामदार हे आठ सदस्य घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.
याशिवाय सोनाली राऊतने आदल्या आठवड्यात टास्क खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे बिग बॉसने तिला थेट नॉमिनेट केलं होते. या घरात पार पडलेल्या शेणाचं दार की मेणाचं दार या कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमध्ये सोनाली राऊतनं सहभागी होण्यास नकार दिला होता. बिग बॉसच्या घरात टास्क न खेळणं हा मोठा गुन्हा मानला जातो. सोनालीच्या वागणुकीमुळे तिला नॉमिनेट करण्यात आलं होते. याशिवाय रितेश देशमुखने सुद्धा सोनालीच्या या वागणुकीबद्दल स्पष्ट नाराजी दर्शवली होती.
आता ही चूक सोनालीला चांगलीच महागात पडली आहे. टास्क न खेळल्यामुळे ती तिच्या चुकीने नॉमिनेट झाली होती. आता सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार सोनाली राऊत बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर गेली आहे.
रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर सोनालीच्या या चुकीच्या वागणूकीची चांगलीच शाळा घेतली आहे. रितेशनं संतप्त होऊ तिला सुनावलं, ” सोनाली, हा एॅटिट्यूड तुमच्या घरी ठेवायचा, या घरात नाही. इथे आला आहात तर टास्क खेळावाच लागेल. तुम्ही काय पिकनिकला आला आहात का?” असं रितेशनं म्हटलं आहे.






