मालिकेतील नागराजच्या अटकेनंतर आता मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. मालिकेतील किल्लेदार कुटुंबियांंचं एकेक सत्य बाहेर येत असल्याने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. आपलं पहिल्या क्रमांकाचं अव्वल स्थान राखून ठेवलयानंतर दुसऱ्या नंबर येते ती, अर्णव इश्वरीची तू ही रे माझा मितवा ही मालिका आहे. सुरुवातीला ही मालिकेची वेळ उशिराची होती. त्यानंर जेव्हा मालिकेला प्रेक्षकांची मिळणारी पसंती जेव्हा लक्षात आली त्यावेळी मालिकेचा वेळ बदलून प्राईम टाईमचा स्लॉट देण्यात आला. मालिकेची वेळ बदलल्यानंतर आता टीआरपीमध्ये तू ही रे माझा मितवा टॉप 5 मध्ये असतेच असते.
त्यानंतर येतात ते स्टार प्रवाहवरीवल नशीबवान आणि कमळी मालिका. या दोन्ही मालिकेत सध्या अस्तित्वासाठी आणि वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा सासाठीची चढाओढ दिसत आहे. BARC इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 17 जानेवारी ने 23 जानेवारी दरम्यानचा टीआरपी जाहीर केला आहे. यानुसार ‘नशीबवान’ मालिका 3.9 टिंगसह तिसऱ्या स्थानी आहे. तर, ‘कमळी’ 3.7 रेटिंगसह चौथ्या स्थानी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आठवड्यात तारिणी मालिका देखील टॉप 5 मध्ये आली आहे.
सध्या झी मराठीवरील तारिणी मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. तारिणीनंतर कोणती मालिका असेल तर ती म्हणजे वीण दोघांतली तुटेना. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची ही मालिका सहाव्या स्थानी आहे. मात्र काही दिवसांपुर्वी जी मालिका अव्वलस्थानी होती ती घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा टीआरपी घसरल्याचं पाहायला मिळत आहे.
मराठी मालिकांचा टीआरपी
1. ठरलं तर मग – ४.९
2. तू ही रे माझा मितवा – ४.१
3.
नशीबवान – ३.९
4. कमळी – ३.७
5. तारिणी – ३.६ मी सावित्रीबाई जोतिराव फुले – ३.६
6. लग्नानंतर होईलच प्रेम – ३.५ -वीण दोघांतली ही तुटेना – ३.५
7. लक्ष्मी निवास – ३.३
8. वचन दिले तू मला – ३.२
9. देवमाणूस – ३.१
10. तुझ्या सोबतीने – ३.०
11. तुला जपणार आहे – २.५
12. शुभ श्रावणी २.४
13. घरोघरी मातीच्या चुली – २.३
अशी एकूण मालिकेची टीआरपी रेटींग आहे.






