Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indriya Jewellery : पारंपरिक कारागिरी आणि आधुनिक फॅशनचा मेळ! आदित्य बिर्लांच्या ‘इंद्रिया’ ब्रँडची ठाण्यात दिमाखदार एन्ट्री

आदित्य बिर्ला ग्रुपच्या 'इंद्रिया'या प्रीमियम ज्वेलरी ब्रँडने ठाण्यातील लेक शोअर मॉलमध्ये आपले पहिले भव्य स्टोअर सुरू केलं आहे. यामुळे त्यांनी महाराष्ट्रात एक मोठे पाऊल टाकले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 14, 2026 | 02:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आधुनिक फॅशनचा मेळ!
  • आदित्य बिर्लांच्या ‘इंद्रिया’ ब्रँडचा धमाका,
  • ठाण्यात दिमाखदार एन्ट्री
आदित्य बिर्ला ज्वेलरी ब्रँड इंद्रियाने ठाणे येथे आपले पहिले स्टोअर सुरू करून महाराष्ट्रातील वाढती उपस्थिती अधिक दृढ केली आहे. या लाँचसह दागिन्यांची विशेष आवड असलेल्या, सण-उत्सवांच्या खरेदीला प्राधान्य देणाऱ्या आणि डिझाइन-आधारित रिटेल अनुभवांकडे आकर्षित होणाऱ्या उच्च-विकसित शहरी बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याचे इंद्रियाचे धोरण अधिक दृढ झाले आहे.

FIFA World Cup 2026: कन्फर्म सॅलरी तर फक्त ट्रेलर! जाहिराती, हॉटेल्स अन्…अब्जाधीश फुटबॉल स्टार्सच्या कमाईचा काय फॉर्म्युला?

प्रिमियम लाईफस्टाईल आणि रिटेल केंद्र

ठाणे पश्चिमेतील प्रमुख रिटेल केंद्र लेक शोअर मॉलच्या पहिल्या मजल्यावर मोक्याच्या ठिकाणी हे स्टोअर सुरू करण्यात आले आहे. हे स्टोअर ग्राहकांना दागिन्यांचा विलोभनीय आणि ग्राहक-केंद्रित अनुभव मिळावा यासाठी अत्यंत विचारपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे. समृद्ध महाराष्ट्रीयन वारसा आणि आधुनिक शहरी आकांक्षा यांचा सुरेख संगम साधणारे शहर म्हणून ठाण्याची ओळख बऱ्याच काळापासून आहे आणि येथे चोखंदळ व वैविध्यपूर्ण ग्राहक वर्ग राहतो. प्रिमियम लाईफस्टाईल आणि रिटेल केंद्र म्हणून नावारूपास येत असलेला लेक शोअर मॉल इंद्रियाचा हा खास अनुभव ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी योग्य जागा आहे. या मॉलचे मोक्याचे ठिकाण, आसपास राहणारी कुटुंबे, व्यावसायिक व उद्योजक यांचा मोठा वर्ग आणि प्रमुख निवासी भागांशी असलेली जवळीक यामुळे दर्जेदार खरेदीचा अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

३२,००० पेक्षा जास्त डिझाइन्सचे उत्कृष्ट कलेक्शन

या स्टोअरच्या माध्यमातून इंद्रियाचे उद्दिष्ट शहरातील ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी पूर्ण करण्याचे आहे. यासाठी येथे सण-उत्सव, जीवनातील महत्त्वाचे टप्पे आणि दैनंदिन फॅशनसाठी खास डिझाइन केलेले सोने, हिरे आणि पोल्की दागिन्यांचे ३२,००० पेक्षा जास्त डिझाइन्सचे उत्कृष्ट कलेक्शन उपलब्ध करण्यात आले आहे. इंद्रियाचे डिझाइनला प्रथम प्राधान्य देण्याचे तत्त्वज्ञान अधोरेखित करत हे स्टोअर पारंपरिक कारागिरी आणि आधुनिक सौंदर्यशास्त्र यांचा सुरेख संगम घडवून आणते. तसेच, स्टोअरमधील कारागिरी रूम सारख्या खास जागा व्यक्ती व कुटुंबीयांना खरेदीचा आगळावेगळा आणि संस्मरणीय अनुभव देतात.
या नव्या स्टोअरच्या लाँचसह इंद्रियाने पश्चिम भारतात आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे, जिथे दागिन्यांचा व्‍यापक पोर्टफोलिओ आणि वैशिष्ट्यपूर्ण इन-स्टोअर अनुभव शहरामधील ग्राहकांच्या जवळ आणला आहे.

वेगाने वाढणारी ज्वेलरी बाजारपेठ

या प्रसंगी मत व्‍यक्त करत इंद्रियाचे सीईओ श्री. संदीप कोहली म्हणाले, “वेगाने वाढणारी शहरी लोकसंख्या, वाढत्या आकांक्षा आणि डिझाइन-आधारित, प्रीमियम रिटेल अनुभवांबद्दलची प्रचंड ओढ यांमुळे ठाणे महाराष्ट्रातील सर्वात गतिमान आणि वेगाने वाढणारी ज्वेलरी बाजारपेठ आहे. याच कारणामुळे ठाणे केवळ मुंबईचा विस्तार न राहता स्वतःच्या बळावर परिपक्व रिटेल बाजारपेठबनले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रमुख निवासी आणि व्यावसायिक केंद्र म्हणून या शहराचा वेगाने विकास होत असताना उत्कृष्ट कारागिरी, डिझाइनचे व्‍यापक पर्याय आणि दागिन्यांच्या खरेदीचा उच्च दर्जाचा अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांची सेवा करण्याची मोठी क्षमता आम्हाला येथे दिसते. ठाण्यातील आमच्‍या या पहिल्‍या स्‍टोअरमधून उच्च विकास क्षमता असलेल्या बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याचे आणि विचारपूर्वक डिझाइन केलेल्या रिटेल केंद्रांच्या माध्यमातून ग्राहकांना आधुनिक दागिन्यांचा अनुभव जवळ आणण्याचे इंद्रियाचे धोरणात्मक उद्दिष्ट दिसून येते.”

आधुनिक ग्राहकांसाठी हक्‍काचे ज्वेलरी डेस्टिनेशन

इंद्रिया संपूर्ण भारतात आपल्या रिटेल नेटवर्कचा विस्तार करत असताना विचारपूर्वक तयार केलेल्या जागा, आधुनिक कारागिरी आणि दागिन्यांच्या उत्कृष्ट अनुभवांच्या माध्यमातून ग्राहकांशी अर्थपूर्ण नाते जोडण्याच्या ब्रँडच्या दृष्टिकोनात महाराष्ट्र हे नेहमी केंद्रस्थानी राहिले आहे. ठाणे पश्चिम येथील हे नवीन स्टोअर प्रत्येक खरेदीमध्ये डिझाइन, भावना आणि स्वतःची स्वतंत्र ओळख शोधणाऱ्या भारतातील आधुनिक ग्राहकांसाठी हक्‍काचे ज्वेलरी डेस्टिनेशन बनण्याच्या इंद्रियाच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.

Gramodayam Yojana : ग्रामीण तरुणांनो आता स्वतःचा बिझनेस सुरू करा! ‘ग्रामोदयम’ योजने अंतर्गत ट्रेनिंगसोबत बँक लोनचीही सोय

Web Title: Aditya birla jewellery brand indriya launches first store in thane mumbai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Aditya Birla
  • Artificial Jewellery
  • Business News
  • Gold Jewellery
  • jewellery
  • Marathi News

संबंधित बातम्या

Rice Storage Tips: तांदूळ हवाबंद डब्यात ठेवूनही किडे पडतात? ‘हे’ कारण जाणून घ्या!
1

Rice Storage Tips: तांदूळ हवाबंद डब्यात ठेवूनही किडे पडतात? ‘हे’ कारण जाणून घ्या!

Nepal Flood Viral Video: पूराच्या थैमानातही लाजिरवाणी घटना; मृत महिलेचे कानातले काढण्याचा प्रयत्न, Video Viral
2

Nepal Flood Viral Video: पूराच्या थैमानातही लाजिरवाणी घटना; मृत महिलेचे कानातले काढण्याचा प्रयत्न, Video Viral

शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा
3

शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा

Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई
4

Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.