(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कोणत्या शेअर्स कोणत्या कारणामुळे चर्चेत येईल आणि त्याचा त्याला फायदा होईल सांगता येत नाही. आताच मेलोडी चॉकलेटच बघाना पंतप्रधानांची एक रील आणि पार्लेचा स्टॉक गगनाला भिडला. आताही असंच झालं. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन केवळ त्यांचे चित्रपट, गाणी आणि केबीसीमुळेच चर्चेत नसतात, तर त्यांच्याकडे व्यावसायिक बुद्धिमत्तेमुळे चर्चेत आले आहेत. शेअर बाजारात त्यांची बरीच मोठी गुंतवणूक आहे. ते वेळोवेळी शेअर्सची खरेदी-विक्री करतात. बिग बी फायदेशीर व्यवहार करण्यापासून कधीही मागे हटत नाहीत. अलीकडेच त्यांनी असेच एक पाऊल उचलले आहे, ज्यामुळे ते चर्चेत आले आणि त्यासोबत एक स्टॉकही चांगला चर्चेत आला.
अमिताभ बच्चन यांनी स्टील वायर उत्पादन करणारी कंपनी डीपी वायर्स लिमिटेडमधील आपल्या शेअर्सचा काही भाग विकला. त्यांनी खुल्या बाजारात कंपनीचे १,२३,६२२ शेअर्स विकले, जे ०.७९% हिस्सेदारी दर्शवते. या व्यवहाराचे मूल्य अंदाजे ₹२.४८ कोटी होते.
NSE च्या आकडेवारीनुसार, अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी हे शेअर्स अंदाजे २००.८४ रुपये प्रति शेअर दराने विकले. मार्च २०२६ च्या तिमाहीअखेरीस, त्यांच्याकडे डीपी वायर्समध्ये ३.२७ लाख शेअर्स, म्हणजेच २.११% हिस्सा होता.
अमिताभ बच्चन यांनी केवळ आपले शेअर्स विकले नाहीत, तर कंपनीचे ४१,५६६ शेअर्स खरेदीही केले. त्यांनी हे शेअर्स अंदाजे १९९.९० रुपये प्रति शेअर दराने खरेदी केले, ज्याची एकूण किंमत अंदाजे ८३.०९ लाख रुपये होती. शेअर बाजाराच्या आकडेवारीमध्ये डीपी वायर्सचे शेअर्स खरेदी करणाऱ्या इतर गुंतवणूकदारांची स्पष्ट ओळख पटलेली नाही. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, जरी अमिताभ बच्चन यांनी आपले शेअर्स विकले असले तरी, कंपनीमधील त्यांचा हिस्सा संपलेला नाही, कारण त्यांनी केवळ त्यांच्या शेअर्सचा काही भाग विकला आहे.
अमिताभ बच्चन यांनी आपले शेअर्स विकताच, डीपी वायर्सच्या शेअर्समध्ये ४.५६% नी वाढ होऊन ते ₹२१३.०३ वर पोहोचले. हा केवळ अमिताभ बच्चन यांचा दिखाव्या साठी स्टंट होता की शेअर बाजारातील एक सामान्य तेजी हे समजून घेणं कठीण आहे.






