सातासमुद्रापार 'ही' कंपनी वापरतीये अमुलचा ट्रेडमार्क, दिल्ली उच्च न्यायालयाचा कंपनीला दणका
भारतात सहकार चळवळीचा इतिहास असलेली संस्था अमुलला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सीमापार ट्रेडमार्क उल्लंघनाच्या एका मोठ्या प्रकरणात न्यायालयाने अमूलला हा दिलासा दिला आहे. भारतातील सर्वात मोठा डेअरी ब्रँड अमूलच्या बाजूने टेरे प्रिमिटिव्ह या इटालियन कंपनीविरुद्ध मनाई आदेश मंजूर करण्यात आला आहे. इटालियन फर्म ‘अमुलेट्टी’ ट्रेडमार्क अंतर्गत कुकीज आणि चॉकलेट कव्हर बिस्किटे विकत होती. हे अमूलच्या प्रसिद्ध ट्रेडमार्क साधर्म ठेऊन आहे. त्यामुळे आता कंपनीला हे खुपच मोठे यश मिळाले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात ट्रेडमार्कचा दावा दाखल
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन आपल्या दुग्धजन्य पदार्थांचे अमूल या ब्रँड नावाने मार्केटिंग करते. कंपनीने आपले वकील अभिषेक सिंग यांच्यामार्फत दिल्ली उच्च न्यायालयात ट्रेडमार्कचा दावा दाखल केला आहे. सिंग यांनी उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, अमूल केवळ भारतातील घरगुती नाव नाही तर सीमापारही त्यांची प्रतिष्ठा आहे. इंटरनॅशनल फार्म कॉम्प्रिहेन्शन नेटवर्कच्या 2020 च्या सर्वेक्षणानुसार, जगातील 8 आघाडीच्या शीर्ष डेअरी संस्था म्हणून अमुलची ओळख आहे.
इस्त्राईलमधील टेरे प्रिमिटिव्ह अमूलची कॉपी
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन आपल्या अमूल या ब्रँड नावाने दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करते. अमुलने आपले वकील अभिषेक सिंग यांच्यामार्फत ट्रेडमार्क दावा दाखल केला होता. सिंग यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, “अमूल हे केवळ भारतातील घरगुती नाव नाही तर या ब्रॅंडने जगभरातील अनेक देशांमध्ये प्रतिष्ठा मिळवली आहे. असे असताना इस्त्राईलमधील टेरे प्रिमिटिव्हने ‘अमूल’ ब्रॅंडच्या स्वरूपाची, शैलीची आणि पद्धतीची ‘स्पष्टपणे’ कॉपी केली आहे. अमूलच्या नावाला ‘एटी’ हा शब्द जोडला आणि स्वतःचा ब्रँड तयार केला आहे.”
उत्पादनांची सूची ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राची स्थापना करण्यासाठी, असा युक्तिवाद करण्यात आला की इटालियन कंपनी आपल्या वेबसाइटवर आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उल्लंघनाच्या चिन्हाखाली आपल्या उत्पादनांची जाहिरात करत आहे. हे प्लॅटफॉर्म भारतातून उपलब्ध आहेत. त्यामुळे यावर बंदी घालावी. अशी मागणी अमुलकडून करण्यात येत आहे. न्यायालयाने इटालियन कंपनीला त्यांच्या वेबसाइटवरून उत्पादनांची सूची ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश दिले आणि मेटा इंकला इटालियन कंपनी आपल्या उत्पादनांची जाहिरात करत असलेल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम खात्यांचे युआरएल ब्लॉक/सस्पेंड/डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.