Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आलं हसू
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरांनी घेतली उसळी, चांदीही तेजीत! आजचे नवे दर वाचून थक्क व्हाल
सोमवार, ५ जानेवारी रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी ५० हे बेंचमार्क निर्देशांक घसरणीवर बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ३२२ अंकांनी घसरून ८५,४३९ वर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक १०६ अंकांनी घसरून ६०,०४४ वर बंद झाला. सेन्सेक्स ३२२ अंकांनी म्हणजेच ०.३८% ने घसरून ८५,४३९.६२ वर स्थिरावला, तर निफ्टी ५० ७८ अंकांनी म्हणजेच ०.३०% ने घसरून २६,२५०.३० वर बंद झाला. विस्तृत बाजारपेठांमध्ये चांगली कामगिरी झाली, बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.०५% आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.०७% ने वाढला. (फोटो सौजन्य – Pinterest)
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल, बाजारातील या तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील या तज्ञांनी आज गुंतवणूकदारांसाठी युनियन बँक, मॅरिको, डीएलएफ, बीएसई, भारती एअरटेल, टीडी पॉवर सिस्टम, डेटा पॅटर्न, सुमितोमो केमिकल या स्टॉक्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी दिल्लीवरी, रेलिगेअर एंटरप्रायझेस आणि डीएलएफ या तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. यामध्ये पीजी इलेक्ट्रोप्लास्ट, मदरसन सुमी वायरिंग इंडिया, एमक्युअर फार्मास्युटिकल्स, क्रेडिटअॅक्सेस ग्रामीण आणि व्होल्टास यांचा समावेश आहे.






