ॲपलची भारतात मोठी झेप; ...तोडला 50 वर्षांचा विक्रम, व्यवसायात मोठी वाढ!
जेव्हा ॲपल ही कंपनी चीनची साथ सोडून, भारतात आली. तेव्हा कुणालाही वाटले नव्हते की अवघ्या काही वर्षांमध्ये ही कंपनी भारतात मोठा विक्रम करेल. गेल्या 50 वर्षात कोणत्याही कंपनीने न केलेला विक्रम ॲपल कंपनीने केला आहे. कंपनीचा विक्रम हा मुख्यतः उत्पादन आणि निर्यातीबाबत आहे. ज्यामुळे आता कंपनीची उलाढाल 2 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जो मागील ५० वर्षातील मोठा विक्रम आहे.
बनले आघाडीचे पुरवठादार केंद्र
दोन वर्षांपूर्वी चीनमधील कोविड परिस्थितीमुळे ॲपलने आपले धोरण बदलले. आणि कंपनीने भारतात प्रवेश आपले उत्पादन वाढवले. आता भारत ही केवळ ॲपलसाठी मोठी बाजारपेठ बनलेली नाही, तर पुरवठा करणारे एक आघाडीचे केंद्र देखील बनले आहे. आयफोन आणि ॲपलची इतर उत्पादने भारतातून जगातील अनेक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. मागील काही वर्षापासून आयफोनच्या निर्यातीत मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कंपनीची भारतात 2 लाख कोटींपर्यंत वाढ
त्यामुळेच ॲपल आणि फॉक्सकॉन कंपन्या भारतात सतत आपल्या उत्पादन युनिट्सचा विस्तार करत आहेत. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. भारत सरकारची पीएलआय योजनाही या कंपन्यांसाठी खूपच उपयुक्त ठरली आहे. ॲपलच्या भारतातील कामकाजात आर्थिक वर्ष 24 मध्ये 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ज्याची किंमत 2023 या आर्थिक वर्षामध्ये 1.15 लाख कोटी रुपये होती.
का झालीये कंपनीच्या व्यवसायात वाढ?
ही वाढ प्रामुख्याने आयफोन उत्पादन आणि मॅकबुक, आयमॅक, आयपॅड, वॉच आणि एअरपॉड्सच्या देशांतर्गत विक्रीत वाढ झाल्यामुळे दिसून आली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या 50 वर्षात भारतातील सर्व कंपन्यांमध्ये ॲपलच्या उत्पादन आणि निर्यातीत सर्वाधिक वेगाने वाढ झाली आहे. दरम्यान, कंपनीच्या एकूण जागतिक महसुलात भारतीय महसुलाचा वाटा २ टक्के इतका आहे.
केंद्र सरकारने 2020 पासून स्मार्टफोन उत्पादन लिंक्ड-इन्सेंटिव म्हणजेच पीएलआय योजना सुरू केली होती. तेव्हापासून कंपनीची वाढ भारतात दिसून आली. ॲपलने 2021 मध्ये भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केले. त्याअगोदर चीनबाहेर कंपनीचे पहिले उत्पादन सुरु होते. भारतात फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनकडूनही आयफोनची निर्मिती केली जात आहे. या कंपन्यांचे मूल्य 2024 च्या आर्थिक वर्षात 1.20 लाख कोटी रुपये आहे.