गावपुढाऱ्यांचा माज मतपेटीने उतरवला! बालेकिल्ल्यातच 'कमळ' कोमेजले; विश्वासाला तडा की भाकरी पालटली?
ज्या गावांतून ‘सगळं पैक आहे अशी हमी दिली जात होती, त्याच गावांनी वेगळाच कौल दिला. निवडणुकीच्या प्रचारात अनेक गावपुढारी, माजी पदाधिकारी, साखर कारखान्याचे संचालक, पंचायत समिती सभापती, सरपंच परिषद नेते व्यासपीठावर खुर्चा लावून बसत होते. ‘बाबा, दादा, भाऊ, अण्णा काळजी करू नका, गाव शंभर टक्के तुमचंच!’ अशा विश्वासाच्या घोषणा होत होत्या, पण निकालाने दाखवून दिले की मतदारांनी कोणालाही गृहीत धरले नाही.
खर्शी बारामुरे या गावात शिवसेनेचे संदीप पवार यांना ३३७ मते मिळाली, तर वसंतराव मानकुंबरे यांना अवधी ३१० मते. म्हणजेच २७ मतांची आघाडी शिवसेनेला, हेच ते गाव, जिथे भाजपचे माजी उपसभापती दत्ता गावडे आणि माजी उपसभापती हनुमंतराव पार्ट यांसारखे दिग्गज नेते सक्रिय होते. व्यासपीठावरून मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या या गावानेच भाजपला धक्का दिला.
आंबेकर तर्फे कुडाळ येथे शिवसेनेला तब्बल १०० मतांची आघाडी मिळाली. हे गाव मानकुंबरे यांचे हक्काचे मानले जात होते. विकासकामांची यादी मोठी असतानाही मतदारांनी वेगळा कौल दिला, कोट्यवधींचा विकास झाला, असे व्यासपीठावर सांगणाऱ्या नेत्यांना मतपेटीने वेगळेच उत्तर दिले.
सर्वांत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या वडाचे म्हसवे गावांत जावळी पंचायत समितीच्या माजीसभापती अरुणा शिर्के आणि त्यांचे पती अजय शिर्के है मानकुंबरे यांच्या प्रत्येक सभेत उपस्थित होते. मात्र त्यांच्याच गावात मानकुंबरे यांना शिवसेनेपेक्षा शंभर मते कमी पडली. तब्बल ५८० मते विरोधात गेली. माजी सभापतींच्या गावातच अशी स्थिती निर्माण झाल्याने नेमके चुकले कुठे, असा सवाल उपस्थित झाला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या गावात मानकुंबरे यांना १५८ मते मिळाली, म्हणजेच त्या गावातही सुमारे १५० मतदार विरोधी गटाचे असल्याचे स्पष्ट झाले. राजकीय समीकरणे किती गुंतागुंतीची आहेत, याचे हे उदाहरण मानले जात आहे.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीहरि गोळे यांच्या हातगेघर गावात २८९ मते विरोधात गेली, ‘सबका साथ, सबका विकास’ची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांच्या गावातव २५१ मते विरोधात गेल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. गावपातळीवर मतदारांमध्ये नाराजी होती कार की स्थानिक पात्तळीवरील गटबाजी कारणीभूत ठरली? याचा उहापोह सुरू आहे.
सरपंच परिषदेचे अध्यक्ष समाधान पौपळे यांच्या पालुय गावात मानकुंबरे यांना ३१३ मते, तर शिवसेनेला २९० मते मिळाली, स्वतः पीपचे उमेदवार असूनही त्याच्या गावात २९० मते विरोधात गेली आणि ते पराभूत झाले. ‘कोट्यवधीचा विकास झाला, या केलेल्या दाव्यावरच सवाल उपस्थित होत आहे.






