Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधीच महागाई त्यात पेंटचेही किंमती महागले! Asian Paints च्या दरात 12 टक्क्यांची वाढ; बजेटवर होणार मोठा परिणाम

देशातील सर्वात मोठी पेंट कंपनी 'एशियन पेंट्स'ने रंगाच्या दरात १२ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक तणावामुळे कंपनीने घेतलेल्या हा निर्णय आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 14, 2026 | 03:29 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पेंटचेही किंमती महागले!
  • Asian Paints च्या दरात 12 टक्क्यांची वाढ
  • बजेटवर होणार मोठा परिणाम
महागाईचं दणका आता सामान्यांना चांगलाच बसला आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून ते रोजच्या जीवनातील वापरापर्यंत सगळ्याचेच दर वाढले आहेत. जर तुम्ही आता किंवा दिवाळीपूर्वी कधीही तुमचे घर रंगवण्याचा विचार करत असाल, तर त्याचंही बजेट आणखीनच वाढणार आहे. देशातील सर्वात मोठी पेंट कंपनी, एशियन पेंट्सने, निवडक पेंट उत्पादनांवर १२% पर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. पण नेमकी ही दरवाढ का करण्यात आली. कंपनीचे म्हणणे आहे की, पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे कच्च्या मालाचा आणि वाहतुकीचा खर्च वाढला आहे, ज्यामुळे हा निर्णय घेण्यास भाग पडले आहे. हे नवीन दर कधीपासून लागू होतील आणि त्याचा काय परिणाम होईल?

अंबानी-अदाणींचे टेन्शन वाढणार! कुमार मंगलम बिर्लांची रिन्यूएबल क्षेत्रात सर्वात मोठी एन्ट्री; 17200 कोटींचा मेगा करार

नवीन दर कधी लागू होतील?

कंपनीच्या म्हणण्यानुसार, पेंटचे नवीन दर आज, १४ जुलै २०२६ पासून लागू होतील. ही दरवाढ उत्पादन आणि श्रेणीनुसार वेगवेगळी असेल. काही उत्पादनांच्या दरात कमी वाढ होईल, तर काहींच्या दरात १२% पर्यंत वाढ होईल.

पेंट महाग का झाले?

एशियन पेंट्सने सांगितले की, पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यासोबतच सागरी मालवाहतुकीचा खर्चही वाढला आहे. पेंट बनवण्यासाठी वापरली जाणारी अनेक रसायने आणि कच्चा माल आयात केला जातो, त्यामुळे खर्च वाढल्याचा थेट परिणाम भावांवर झाला आहे.

कोणाला सर्वाधिक फटका बसेल?

या निर्णयाचा सर्वाधिक फटका अशा लोकांना बसणार आहे जे नवीन घर बांधत आहेत किंवा घराची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्याच्या तयारीत आहेत. बिल्डर्स, इंटिरिअर डिझायनर्स आणि पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर्सचा खर्चही वाढू शकतो. अशा परिस्थितीत घर रंगवण्याचा एकूण खर्च पूर्वीपेक्षा जास्त असू शकतो.

इतर कंपन्या किंमती वाढवतील का?

जर कच्च्या मालाचा आणि वाहतुकीचा खर्च जास्त राहिला, तर इतर पेंट कंपन्यासुद्धा येत्या काही दिवसांत किंमती वाढवू शकतात. तथापि, इतर प्रमुख कंपन्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

किमती आणखी वाढू शकतात का?

तज्ज्ञांच्या मते, जर पश्चिम आशियातील तणाव लवकरच कमी झाला नाही आणि कच्च्या मालाच्या किमती जास्त राहिल्या, तर पेंट उद्योगावर खर्चाचा दबाव कायम राहील. त्यामुळे, भविष्यात आणखी दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अंबानी-अदाणींचे टेन्शन वाढणार! कुमार मंगलम बिर्लांची रिन्यूएबल क्षेत्रात सर्वात मोठी एन्ट्री; 17200 कोटींचा मेगा करार

Web Title: Asian paints hikes paint prices by 12 percent reasons marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Business News
  • High Inflation Rate
  • Indian Inflation
  • Inflation Increases
  • Marathi News

संबंधित बातम्या

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा
1

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा
2

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
3

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
4

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.