जानेवारी महिन्यात इतके दिवस राहतील बॅंका बंद; वाचा... सुट्ट्यांची संपुर्ण यादी!
डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आता लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होईल. म्हणूनच आता अनेकजण पुढच्या महिन्यात करावयाच्या कामांची यादी करत असतील. यात बँकेशी संबंधित काही कामे असतील तर अगोदर डिसेंबर महिन्यात बँकांना सुट्टी नेमकी कधी आहे? हे जाणून घेणे गरजेचे आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षभरातील बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करते. या यादीनुसार बँकांना सुट्टी असते. याशिवाय स्थानिक आणि धार्मिक सण उत्सवांच्या निमित्ताने देखील सुट्टी जाहीर करण्यात येते. डिसेंबरमध्ये शेवटच्या पंधरवाड्यात, देशभरात राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्यांमुळं बँका बंद राहणार आहेत.
मोफत आधार कार्ड अपडेट करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ; 14 जून 2025 पर्यंत असेल संधी!
बँका कधी बंद राहतील?
लक्षात ठेवा की एका राज्यात कोणत्याही दिवशी बँक सुट्टी असेल याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या राज्यातही त्याच दिवशी सुट्टी असेल. रविवार आणि चौथा शनिवारी संपूर्ण देशभरात बँका बंद राहतील तर विविध सण, मुक्ती दिवस, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला काही राज्यात बँका बंद राहतील. या दिवशी फक्त संबंधित राज्य किंवा प्रदेशातील बँका बंद राहणार आहेत.
सुट्टीच्या दिवशी व्यवहार कसा करणार?
बँकांच्या शाखा सुट्ट्यांमुळे बंद असल्या तरी ऑनलाईन सेवांचा वापर करुन ग्राहक त्यांची आर्थिक कामे पूर्ण करु शकतात. रोख रक्कम हवी असल्यास तर एटीएममधून रक्कम काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे आहे. याशिवाय यूजर्स Google Pay, Phone Pay, Paytm, PayZapp सारख्या अॅप्सचा वापर करूण आर्थिक व्यवहार करू शकतात. बँकेच्या वेबसाइट किंवा मोबाईल ॲपद्वारे नेट बँकिंग वापरू शकतात. यामध्ये मनी ट्रान्सफर, बिल भरणे आणि बॅलन्स चेक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
सर्वात शक्तिशाली महिलांची नावे जाहीर, सीतारामण यांच्यासह या भारतीय महिलांचा समावेश, वाचा… यादी!
15 ते 31 डिसेंबर 2024, बँकांच्या सुट्ट्यांची यादी
15 डिसेंबर – रविवार (संपूर्ण देशभर)
18 डिसेंबर – बुधवार (मेघालय)
19 डिसेंबर – गुरुवार गोवा मुक्ती दिन(गोवा)
22 डिसेंबर – रविवार (संपूर्ण देशभर)
24 डिसेंबर – मंगळवार (मिझोरम, नागालँड आणि मेघालय) ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सुट्टी
25 डिसेंबर – बुधवार (संपूर्ण देशभर) ख्रिसमस
26 डिसेंबर – गुरुवार (मिझोरम,नागालँड, मेघालय) ख्रिसमस सण साजरा करण्यासाठीसुट्टी
27 डिसेंबर – शुक्रवार (मिझोरम,नागालँड, मेघालय) ख्रिसमस सण साजरा करण्यासाठीसुट्टी
28 दिसंबर – चौथा शनिवार (संपूर्ण देशभर)
29 दिसंबर – रविवार (संपूर्ण देशभर)
31 डिसेंबर – मंगळवार (मिझोरम आणि सिक्कीम)