फोटो सौजन्य - pinterest
Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्प 2024 सादर करत आहेत. या अर्थसंकल्पांर्गत त्यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंबाबत देखील मोठा निर्णय जाहीर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प 2024 नुसार मोबाईल चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी केल्या जाणार आहेत. तर मोबाईल हँडसेटच्या किंमती कमी करून ते देखील स्वस्त होणार आहेत. यासोबतच मोबाईलचे सुटे भाग देखील आता स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. याशिवाय Solar sets, Electric वाहने, X ray machine आणि लिथियम battery या वस्तूंच्या दरात देखील कपात केली जाणार आहे.
मोबाईल चार्जर, मोबाईल हँडसेट, मोबाईलचे सुटे भाग यासह Solar sets, X ray machine यासांरख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतींमध्ये कपात केली जाणार आहे. याशिवाय Electric वाहने देखील आता स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. संसदेत आपला अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सितारमन म्हणाल्या की, देशांतर्गात सुरु असणाऱ्या उत्पादनात 3 पटीने वाढ झाली आहे. तसेच मोबाईल फोनच्या निर्यातीत जवळपास 100 पट वाढ झाली आहे. गेल्या 6 वर्षांत भारतातील मोबाईल उद्योग ग्राहकांच्या पसंतीनुसार प्रोडक्ट्स तयार करत आहेत. या सगळ्याचा विचार करता मी मोबाइल फोन, मोबाइल पीसीबीए आणि मोबाइल चार्जरवरील बीसीडी (basic customs duty) 15% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव सादर करत आहे.
निर्मला सितारमन यांच्या या प्रस्तावामुळे 3 कोटी भारतीयांना एक मोठी भेट मिळणार आहे. तसेच Solar sets, Electric वाहने, X ray machine, लिथियम battery, मोबाईल हँडसेट, मोबाईल चार्जर या वस्तूंच्या किंमती कमी झाल्यास ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते.