निरोगी ग्राहक वित्त बाजाराचे संवर्धनासाठी सहयोगी दृष्टीकोण महत्त्वाचा, आशीष तिवारी यांचे मत
तरुण आणि गतिमान लोकसंख्येच्या वाढत्या आकांक्षाना अनुसरून ग्राहक फायनान्स लँडस्केप वेगाने विकसित होत आहे. लोकसंख्येच्या जवळपास 50% भारताचा युवा वर्ग (25 वर्षाखालील) आहे आणि त्यांचा बाजारातील वाढता सहभाग वित्तीय सेवा क्षेत्रातही बदल घडवून आणत आहे. जशी डिजिटल लाट वाढत आहे, तसे कर्ज देणे आणि कर्ज घेण्याच्या जबाबदार पद्धतींची गरज अजून गंभीरतेने जाणवते. शाश्वत आणि निरोगी ग्राहक वित्त बाजाराला चालना देण्यासाठी सावकार, नियामक आणि कर्जदार प्रत्येकाची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
सावकार यात बँका, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी- NBFCs) आणि फिनटेक (Fintech) संस्था येतात ज्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करणारी आर्थिक उत्पादने प्रदान करण्यात आघाडीवर आहेत. येथे या संस्थांची भूमिका निवळ कर्जवाटपाच्या पलीकडे जाते; यात कर्जदारांच्या आर्थिक कल्याणाला प्राधान्य देणाऱ्या जबाबदार कर्ज पद्धतींचा समावेश होतो.
कर्जदारांचा अति फायदा घेतला नाहीत याची खात्री करण्यासाठी सावकारांनी कठोर पत मूल्यांकन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. यामध्ये त्या व्यक्तीच्या परतफेडीच्या क्षमतेचे सर्वसमावेशक मूल्यमापन, त्याचे उत्पन्न आणि विद्यमान आर्थिक दायित्वे या दोन्हींचा विचार केला जातो. याव्यतिरिक्त विविध ग्राहक विभागांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली आर्थिक उत्पादने देण्याने जोखीम कमी करत असताना देखील आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन मिळू शकते.
ग्राहकांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम बनवण्या करिता सावकारांनी आर्थिक साक्षरता उपक्रमांमध्येही गुंतवणूक केली पाहिजे. कर्जदारांना वेळेवर परतफेडीचे महत्व आणि पत संख्येच्या दीर्घकालीन प्रभावाबद्दल शिक्षित करून, सावकार जबाबदार कर्ज घेण्याची संस्कृती वाढवू शकतात, शेवटसरती डिफॉल्टचा (हलगर्जीपणाचा) धोका कमी करतात.
ग्राहक वित्त बाजाराची स्थिरता आणि अखंडता राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका नियामक बजावतात. त्यांचे निरीक्षण हे सुनिश्चित करते की सावकार नैतिक पद्धतींचे पालन करित आहेत, ते ग्राहकांचे लुटेरु कर्ज आणि आर्थिक शोषणापासून संरक्षण करतात. नियामकांनी ग्राहकांच्या हिताचे रक्षण करताना नवोपक्रमासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामध्ये नवीन आर्थिक तंत्रज्ञान आणि आर्थिक समावेश वाढवणारे व्यवसाय मॉडेलला सामावून घेण्याच्या लवचिकतेसह नियामक निरीक्षणाची गरज संतुलित करणे समाविष्ट आहे.
निरोगी ग्राहक वित्त बाजाराला चालना देण्यात कर्जदारांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका असते. आर्थिक शिस्त ही विवेकपूर्ण कर्ज घेणे आणि वेळेवर परतफेड करण्या सकट सकारात्मक क्रेडिट इतिहास राखणे आणि आर्थिक संकट टाळण्याची गुरुकिल्ली आहे. कोणतेही आर्थिक दायित्व स्वीकारण्यापूर्वी कर्जदारांनी त्यांच्या परतफेडीच्या क्षमतेचे काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे आणि कर्जाच्या अटी त्यांच्या गरजेनुसार/ पुन्हा भरण्याची क्षमता आहे याची खात्री केली गेली पाहिजे.
निरोगी ग्राहक वित्त बाजाराची सावकार, नियामक आणि कर्जदार यांच्यातील सहकार्याने भरभराट होते. बाजाराची स्थिरता आणि टिकाव सुनिश्चित करण्यात प्रत्येक भागधारकाची वेगळी परंतु पूरक भूमिका असते. कर्जदारांसाठी सहकार्य हे फिनटेक कंपन्यांसोबत भागीदारीचे रूप धारण करू शकते जेणेकरून चांगले पत मूल्यांकन आणि ग्राहक प्रतिबद्धता यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा. अशा सहकार्यांमुळे आर्थिक उत्पादनांची पोहोच वाढू शकते आणि कमी सेवा असलेल्या लोकसंख्येच्या भागांसाठी ते अधिक प्रवेशयोग्य बनू शकतात.
दुसरीकडे नियामक, विद्यमान नियमांना परिष्कृत करण्यासाठी आणि ग्राहक वित्त लँडस्केपमधील उदयोन्मुख आव्हानांना तोंड देणारी नवीन फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी उद्योग भागधारकांसोबत जवळून काम करू शकतात. सार्वजनिक सल्लामसलत आणि अभिप्राय यंत्रणा प्रभावी आणि संतुलित दोन्ही धोरणे तयार करण्यात मदत करू शकतात. कर्जदारांच्या दृष्टीने सहयोग म्हणजे केवळ ग्राहक म्हणून नव्हे तर माहितीपूर्ण सहभागी म्हणून वित्तीय संस्थांशी संलग्न होणे आहे. कर्जदार आपले अभिप्राय देऊन, गैरव्यवहारांची तक्रार करून आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रमात सहभागी होऊन निरोगी वित्त बाजाराच्या विकासात आपले योगदान देऊ शकतात.
भारताच्या ग्राहक वित्त बाजाराचे भविष्य सावकार, नियामक आणि कर्जदार यांच्या सामूहिक प्रयत्नांवर अवलंबून आहे. जबाबदार कर्ज, वाजवी नियामक पद्धती आणि माहितीपूर्ण कर्ज घेण्याची संस्कृती वाढवून, आम्ही अशी बाजारपेठ तयार करू शकतो जी केवळ ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणार नाही तर देशाची एकूण आर्थिक वाढ आणि स्थिरता आणण्यामध्ये आपले योगदान देवू शकते.