व्हॅलेंटाईन विकच्या पहिल्याच दिवशी राडा! तरुणाने स्वतःच्याच तोंडात मारून घेतली चप्पल; स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेमकं काय केलं तरुणाने ?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रेल्वे स्टेशनवर एका जोडप्याचे जोरदार भांडण सुरु आहे. व्हिडिओमध्ये तरुण रागात दिसत असून आपली चप्पल काढून स्वत:लाचा मारुन घेताना दिसत आहे. आपल्या प्रेयसीला मला मार तू, मला का मारत नाहीस असे म्हणत हातात चप्पल घेऊन स्वत:लाचा मारत आहे. प्रेयसी तरुणाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. दोघांच्या भांडणावरुन लक्षात येते की मानसिक तणावात दोघेही आहेत. हे दृश्य पाहून प्लॅटफॉर्मवरीवल लोकही हैराण झाले आहेत. या व्हिडिओचीच सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Kalesh b/w a Couple at Railway Station pic.twitter.com/cd41ftsYv0 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 7, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे.जोडप्यात नेनका काशानवरुन वाद सुरु आहे याचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावर एका नेटकऱ्याने हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने नक्कीच दुसऱ्या कोणासोबत त्याने व्हॅलेंटनाइन डे साजरा केला असेल असे म्हटले आहे. आणखी एका युजरने तरुणाचे वागणे मेंटल टॉर्चर करणारे असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






