एचडीएफसी लाइफ सुंदरम फायनान्सच्या ग्राहकांना देऊ करणार क्रेडिट लाइफ सोल्यूशन्स!
भारतातील आघाडीच्या विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एचडीएफसी लाइफने सुंदरम फायनान्ससोबतच्या भागीदारीचा विस्तार केला आहे. या सहयोगाच्या माध्यमातून एचडीएफसी लाइफ सुंदरम फायनान्सच्या ग्राहकांना एचडीएफसी लाइफ ग्रुप क्रेडिट प्रोटेक्ट प्लस विमा योजना देऊ करणार आहे. सुंदरम फायनान्सच्या व्यावसायिक वाहन, कार व ट्रॅक्टर्स अशा सर्व कर्ज विभागांतील ग्राहकांना ही योजना देऊ केली जाणार आहे.
१९५४ साली स्थापन झालेली सुंदरम फायनान्स ही सूचित नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) आहे. वित्तीय सेवा व उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसाठी ती ओळखली जाते. कंपनीकडे भक्कम असेट बेस आहे. आघाडीची क्रेडिट मानांकने आहेत आणि सशक्त मूल्यांच्या पालनाबाबत कंपनीचा लौकिक आहे. कंपनीचे भारतभरात ७०० हून अधिक शाखांचे व्यापक जाळे आहे.
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एचडीएफसी लाइफने ६.६ कोटी जणांना आयुर्विमा पुरवला. तसेच ९९.५ टक्के व्यक्तिगत दावे निकाली काढले. त्यातून कंपनीची पॉलिसीधारकांप्रती बांधिलकी दिसून येते. भारतातील आयुर्विम्याच्या स्वीकृतीचे प्रमाण एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ ३.२ टक्के इतके आहे. तर संरक्षणातील तफावत सुमारे ९१ टक्के इतकी आहे. त्यामुळे आर्थिक संरक्षणाची गरज वाढत आहे. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआयने ‘२०४७ सालापर्यंत सर्वांना विमा’ पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतात सर्वांना एकसमान विमा संरक्षण पुरवण्याचे लक्ष्य आयआरडीएआयपुढे आहे.
हे देखील वाचा – केवळ 99 रुपयांत मिळणार ब्रँडेड दारु, या राज्य सरकारकडून नवीन एक्साईज पॉलिसी लागू!
एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर या भागीदारीबद्दल म्हणाल्या आहे की, “सुंदरम फायनान्ससोबत भागीदारी केल्याबद्दल आम्हाला आनंद वाटत आहे. या भागीदारीमुळे सुंदरम फायनान्स आपल्या ग्राहकवर्गाला एचडीएफसी लाइफची आयुर्विमा उत्पादने तसेच एचडीएफसी लाइफ ग्रुप क्रेडिट प्रोटेक्ट प्लस इन्शुरन्स प्लान देऊ शकेल. आयुर्विम्याच्या क्षेत्रातील आपला प्रवास पुढे चालू ठेवताना आम्ही ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ या उद्दिष्टाच्या पूर्तीमध्ये योगदान देण्यासाठीही बांधील आहोत.”
सुंदरम फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक राजीव लोचन हे या भागीदारीबद्दल म्हणाले आहे की, “सुंदरम फायनान्समध्ये, आमच्या ग्राहकांना सर्वच बाबींच्या केंद्रस्थानी ठेवण्याप्रती आम्ही कायम बांधिलकी राखली आहे. गेल्या ७० वर्षांहून अधिक काळापासून आम्ही अनेक पिढ्यांशी आर्थिक सेवांच्या पलीकडे जाणारे विश्वासाचे नाते उभे केले आहे. आम्ही आमचे यश व आकांक्षा यांच्या माध्यमातून ग्राहकांच्या आयुष्याचा भाग झालो आहोत. भविष्यकाळाचा विचार करता, आमची विश्वासाची परंपरा आणि एचडीएफसी लाइफची नवोन्मेष्कारी उत्पादने यांचा मेळ घालताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. कारण, त्यामुळे आमचे ग्राहक, मग ते कोणीही असोत, आणि त्यांच्या पुढील पिढ्या संरक्षित व सक्षम असणार आहेत.”