Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कच्च्या तेलाच्या किमती धडाम… आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले, तरीही भारतात इंधनाचे दर जैसे थे? काय आहे यामागचं गणित?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. जेव्हा जागतिक स्तरावर किमती वाढतात त्याचा परिणाम स्थानिक दरांवर होतो मग आता जेव्हा किमती कमी झाल्या आहेत तर त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित राहिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 16, 2026 | 05:25 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मध्य पूर्वेतील तणाव कमी होत असताना त्याचा थेट परिणाम तेलावर होताना दिसत आहे. त्यात तेल पुरवठ्याबद्दलच्या चिंतेमुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण होत आहे. ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १०९ डॉलरवरून सुमारे ८३ डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत. यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले तरीही, सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्नही आहेत. कच्च्या तेलाच्या किमती आणखी किती खाली येतील, जेणेकरून भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही स्वस्त होतील, याबाबत जाणून घेण्याची सगळ्यांना इच्छा आहे. तर मग नेमकी काय आहे परिस्थिती जाणून घेऊयात.

गावांमध्ये काम मिळेना, शहरातही वाढलं टेन्शन! मे महिन्यात बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी, अर्थव्यवस्था संकटात?

कच्च्या तेलाच्या किमती १०९ डॉलरवरून ८३ डॉलरवर

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांत ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. एके काळी प्रति बॅरल १०९ डॉलर असलेली ही किंमत आता प्रति बॅरल सुमारे ८३ डॉलरवर पोहोचली आहे. याचा अर्थ, अवघ्या काही आठवड्यांत त्याच्या किमतीत २० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव कमी होण्याची अपेक्षा आणि जागतिक पुरवठा वाढण्याची शक्यता यामुळे तेल बाजाराला दिलासा मिळाला आहे.

तेलाच्या किमती का घसरताहेत?

माध्यमांच्या वृत्तानुसार, नजीकच्या भविष्यात इराणचे तेल पुन्हा मोठ्या प्रमाणात जागतिक बाजारात पोहोचण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा वाढल्यास किमतींवर दबाव येईल आणि तेल स्वस्त होऊ शकते. यामुळेच गुंतवणूकदारांनी तेलाच्या किमती घसरण्याचा अंदाज वर्तवायला सुरुवात केली आहे.

भारतासाठी कच्चे तेल महत्त्वाचे का?

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे ८५% आयात करतो. याचा अर्थ आपण कच्च्या तेलासाठी मोठ्या प्रमाणावर इतरांवर अवलंबून आहोत. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींमधील कोणत्याही मोठ्या बदलाचा देशाच्या आयात बिलावर आणि पेट्रोल व डिझेलच्या किमतींवर परिणाम होतो. जेव्हा कच्चे तेल महाग होते, तेव्हा तेल कंपन्यांचा खर्च वाढतो. मात्र, जेव्हा किमती घसरतात, तेव्हा कंपन्यांना दिलासा मिळतो.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी स्वस्त होतील?

जर ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती सातत्याने प्रति बॅरल ८० डॉलर किंवा त्यापेक्षा कमी राहिल्या, तर तेल विपणन कंपन्यांवरील खर्चाचा दबाव कमी होईल. अशा परिस्थितीत, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता वाढू शकते. पण भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती केवळ कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून नसतात. सध्या, तेल कंपन्यांकडून किंवा सरकारकडून दरकपातीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, जर कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ कमी राहिल्या, तर कदाचित सर्वसामान्य माणसाला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काहीसा दिलासा मिळेल.

PM Kisan Installment : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! तारीख ठरली, ‘या’ दिवशी जमा होणार PM किसान योजनेचा 23वा हप्ता

Web Title: Crude oil prices dropping when will petrol and diesel become cheaper in india see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Business News
  • Crued Oil
  • Diesel Petrol Price
  • dollar
  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
1

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Iran Economic Crisis : युद्धाच्या आगीत उध्वस्त झाला इराण; GDP 10 टक्क्यांनी घसरला, महागाई भारतापेक्षा 15 पट जास्त
2

Iran Economic Crisis : युद्धाच्या आगीत उध्वस्त झाला इराण; GDP 10 टक्क्यांनी घसरला, महागाई भारतापेक्षा 15 पट जास्त

Indus Towers चा मोठा सामाजिक उपक्रम! FY26 मध्ये 3.38 कोटी लोकांना फायदा; एकूण लाभार्थ्यांची संख्या 9 कोटींवर
3

Indus Towers चा मोठा सामाजिक उपक्रम! FY26 मध्ये 3.38 कोटी लोकांना फायदा; एकूण लाभार्थ्यांची संख्या 9 कोटींवर

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…
4

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.