डॉलरच्या तुलनेत कोणत्या देशाचे चलन सर्वात कमकुवत, भारतीय रुपयाची स्थिती काय?
जगभरातील अनेक देशांची चलने भारतीय रुपयापेक्षा खूपच कमकुवत आहेत. काही देशांची चलने इतकी कमजोर आहेत की, अमेरिकेचा एक डॉलर खरेदी करम्यासाठी हजारो किंवा लाखो, युनिट खर्च करावे लागतात. पण भारतच नाही तर इतर अनेक देशही आहेत ज्या देशांचे चलन डॉलरच्या तुलनेत सर्वात कमकुवत आहे, यात भारतीय रुपया कोणत्या क्रमांकावर आहेत. असाही प्रश्न उपस्थित होतो.
Rupee Vs Dollar: रुपया विक्रमी निचांकी पातळीवर! 1 डॉलर 90 रुपयांवर, कारण काय?
लेबनानचे चलन लेबनीज पाउंड हे जगातील सर्वात कमकुवत चलन आहे. लेबनॉन हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर स्थित एक देश आहे. लेबनॉन गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. सरकारी गोंधळ, भ्रष्टाचार, बँकिंग व्यवस्थेचे पतन आणि परकीय चलनाचा ऱ्हास यामुळे लेबनीज पौंड जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक बनले आहे. १ एलबीपी = ०.०००११ अमेरिकन डॉलर आणि १ यूएस डॉलर = ८९,८१९.५१ अमेरिकन डॉलर.
आंतरराष्ट्रीय चलनांच्या तुलना करताना, सध्या इराणचे रियाल हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमकुवत चलन बनले आहे. अमेरिका आणि इतर अनेक देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे, इराणचा जागतिक आर्थिक व्यापार जवळपास थांबला आहे. तेलावरून मिळणाऱ्या उत्पन्नावर तीव्र अवलंबित्व असून, देशाच्या अर्थव्यवस्थेत विविधतेचा गंभीर अभाव आहे. याशिवाय, उच्च महागाई आणि देशात सुरू असलेला राजकीय तणाव आर्थिक अस्थिरतेला कारणीभूत झाला आहे.
या आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे, रियालचे मूल्य खाल्याहोण्यास सुरुवात झाली आहे. सध्या १ आयआरआर (इराणी रियाल) = ०.०००२४ अमेरिकन डॉलर इतकी खालची किंमत आहे, तर १ यूएस डॉलर = ४२,११२.११ आयआरआर इतक्या प्रमाणात त्याचे अवमूल्यन झाले आहे.
Russia-India Trade: आता रुपया-रुबलमध्ये होणार व्यवसाय! रशिया म्हणतो, अनेक देशांसोबत डॉलर..
त्याचवेळेस, व्हिएतनामचे चलन व्हिएतनामी डोंग देखील जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक मानले जाते. सध्याच्या विक्रमी विनिमय दरानुसार, १ व्हिएतनामी डोंग = ०.०००३८ अमेरिकन डॉलर इतकी किंमत आहे, आणि १ यूएस डॉलर = २६,३७०.०२ डोंग इतकी किंमत आहे. जरी व्हिएतनामची अर्थव्यवस्था वाढत असली तरी, निर्यातीला चालना देण्यासाठी त्यांच्या सरकारने डोंगचा विनिमय दर जानबू न कमी ठेवला आहे. यामुळे, विनिमय दराच्या दृष्टीने डोंग देखील कमकुवत दिसतो.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, दोन्ही देशांमधील चलनांचे हे अवमूल्यन जागतिक आर्थिक स्थिरतेसाठी चिंता निर्माण करणारे आहे. महत्त्वपूर्ण निर्यातदार असलेल्या देशांमध्ये अशा कमकुवतीमुळे व्यापारात अस्थिरता येऊ शकते, आणि जागतिक चलन बाजारावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
२०२५ मध्ये भारतीय रुपया प्रति डॉलर ९० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. परंतु जगभरातील डझनभर चलने खूपच कमकुवत आहेत. जगातील टॉप २५ सर्वात कमकुवत चलनांच्या यादीत भारतीय रुपया दिसत नाही. मात्र भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची आहे. शिवाय, परकीय कर्ज, महागाई आणि राजकीय स्थिरतेच्या बाबतीत भारताचे स्थान अनेक देशांपेक्षा चांगले आहे. त्यामुळे, भारतीय रुपया कमकुवत होतो, परंतु तो सर्वात कमकुवत श्रेणीपासून खूप दूर आहे.






