छोट्या कंपनीच्या शेअरमधून 96 टक्क्यांचा परतावा; लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूकदार मालामाल!
एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअरची बाजारात जोरदार चर्चा आहे. कंपनीच्या शेअरने गेल्या 7 दिवसात गुंतवणूकदारांचे नशीब पालटून टाकले आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सचा शेअर 5 टक्क्यांपर्यंत उसळला आहे. हा शेअर आता 3,16,597.45 रुपयांवर पोहचला आहे. कंपनीचा शेअर केवळ 7 दिवसांत 3.53 रुपयांहून 3 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. गेल्या 5 दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरने 43,000 रुपयांहून अधिकची उसळी घेतली आहे.
हे देखील वाचा – अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले!
3.53 रुपयांहून 2.36 लाख रुपयांवर पोहोचला शेअर
एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर गेल्या आठवड्यात अधिक चर्चेत आला होता. कंपनीचा शेअर 29 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात 3.53 रुपयांहून वधारून 2,36,250 रुपयांवर पोहचला. या नवीन अपडेटमुळे एल्सिड इन्वहेस्टमेंटचा शेअर भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक ठरला आहे. बीएसई आणि एनएसईवर आयोजित एका स्पेशल कॉल ऑक्शनमुळे ही तेजी आल्याचे दिसून आले आहे.
हे देखील वाचा – गौतम अदानींनी एका झटक्यात बांग्लादेशकडून मिळवले 1450 कोटी; 7000 कोटींची थकबाकी!
5 दिवसात 43,000 रुपयांनी वधारला शेअर
एल्सिड इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअरने गेल्या पाच दिवसांत जोरदार उसळी घेतली. कंपनीचा शेअर गेल्या पाच दिवसांत 15 टक्क्यांहून अधिकने उसळला आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर या कालावधीत 43,108 रुपयांनी वधारला आहे. कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील सर्वकालीन उच्चांकावर 3,16,597 रुपयांवर आहे. तर याच वर्षात कंपनीचा 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 3.37 रुपये इतकी आहे.
आर्थिक वर्ष 2024 मध्ये या कंपनीने डिव्हिडंड देण्यातही रेकॉर्ड केला आहे. या आर्थिक वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना 25 रुपयांचा लाभांश दिला आहे. हा इंडस्ट्रीतील सर्वात जोरदार डिव्हिडंडपैकी एक ठरला आहे. गेल्या आर्थिक वर्षात, २०23 मध्ये सुद्धा कंपनीने 25 रुपये लाभांश दिला होता. तर त्यापूर्वी कंपनीने तीन आर्थिक वर्षांत प्रत्येकी 15 रुपयांचा लाभांश दिला होता.
हे देखील वाचा – 20 नोव्हेंबरला शेअर बाजार बंद राहणार; ‘या’ कारणामुळे शेअर बाजाराला असेल सुट्टी!
काय काम करते कंपनी?
एल्सिड इन्व्हेस्टमेंट ही आरबीआय अंतर्गत गुंतवणूक श्रेणीतील एक नोंदणीकृत गैर बॅकिंग वित्तपुरवठा कंपनी आहे. कंपनीच्या कमाईतील मुख्य स्त्रोत हा त्यांच्या होल्डिंग कंपन्यांकडून मिळणारा लाभांश आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंटने एशियन पेंट्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीकडे पेंट कंपनीत 8500 कोटी म्हणजे 2.95 टक्के वाटा आहे. कंपनीकडे 200,000 शेअर आहेत. त्यातील 150,000 शेअर प्रमोटरोकडे आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)