मुंबईत आदित्य बिरला ग्रुपकडून 'Indriya' ज्वेलरी ब्रँडचे खास आउटलेट लाँच
आदित्य बिर्ला ग्रुपच्या वतीने आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत त्यांचा ज्वेलरी ब्रँड इंद्रियाच्या लाँचची घोषणा करण्यात आली आहे. जुलै महिन्यात लाँच झालेल्या या समूहाने एकूण आठ दालने उघडली आहेत. दिल्लीत तीन, इंदूर, अहमदाबाद, पुणे, मुंबई आणि जयपूरमध्ये प्रत्येकी एक. मुंबईतील बोरिवली येथील नवीन दालनासह हा समूह आपल्या मजबूत ब्रँड इक्विटी आणि बाजारपेठेतील अंतर्दृष्टीचा लाभ घेत, त्याच्या ग्राहक पोर्टफोलिओला आणखी बळकट करतो आहे.
मुंबई ही भारताची गजबजलेली आर्थिक राजधानी आहे. इंद्रियाकरिता हे शहर देशातील आशादायक प्रदेशांपैकी एका असून फॅशनने प्रेरित, वैविध्यपूर्ण आणि समृद्ध ग्राहकांशी संपर्क साधण्याची एक ‘हटके’ संधी मिळवून देते. समकालीन कलांना आपल्यात मिसळून मुंबई शहर दागिन्यांच्या रिटेल विक्रीसाठी एक रोमांचक पार्श्वभूमी प्रदान करते. ज्यामुळे उत्कृष्ट हस्तकला आणि अद्वितीय डिझाईन प्रदर्शित करण्यासाठी ते एक आदर्श ठिकाण म्हणून मुंबईची ओळख आहे.
आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिरला यांनी पुढील पाच वर्षांत भारतातील पहिल्या तीन दागिन्यांच्या रिटेल विक्रेत्यांमध्ये स्थान मिळवण्याच्या उद्देशाने जुलैमध्ये इंद्रियाची सुरुवात केली. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला तब्बल 5,000 कोटी रुपयांच्या अभूतपूर्व गुंतवणुकीचा पाठिंबा आहे, जो भारतातील दागिन्यांच्या रिटेल क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या आदित्य बिर्ला समूहाच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो.
हे देखाील वाचा: मुकेश अंबानींची म्युच्यूअल फंडात एन्ट्री; जिओ-ब्लॅकरॉकला सेबीने दिली मंजुरी!
‘इंद्रिया’ या ब्रँड नावाचा उगम संस्कृत भाषेतून झाला आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, इंद्रिया म्हणजे शक्ती; पाच इंद्रियांची ताकद, आपल्या चेतनेला चालना देणारी इंद्रिये, आपल्याला सभोवतालच्या जगाचा अनुभव घेण्यास आणि अन्वेषण करण्यास प्रवृत्त करतात. आपल्या अस्तित्वाची व्याख्या करतात.
ब्रँड चिन्ह म्हणून इंद्रियाने मादी चिंकारा हरणाची निवड केली आहे. हा प्राणी इंद्रियांचे रूपक असून स्त्रीचे सौंदर्य आणि शालिनतेचे प्रतीक आहे.
इंद्रियाचे संचालक दिलीप गौर म्हणाले की, “आम्ही इंद्रियाच्या माध्यमातून दागिन्यांच्या क्षेत्रातील सर्जनशीलता, प्रमाण, तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अनुभवातील मानकांची पुन्हा व्याख्या करण्यास तयार आहोत. दागिन्यांचा प्रत्येक नमुना हस्तकलेची एक अनोखी कथा सांगतो या समजुतीवर घडविण्यात आला आहे.