GST कमी होताच Tata Motors ॲक्शन मोडमध्ये (फोटो सौजन्य: iStock)
कार खरेदी करतात GST टॅक्स भरणे अनेक खरेदीदारांना आवडत नसे. कित्येकदा हाच जीएसटी कमी व्हावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात होती. केंद्र सरकारने हीच मागणी पूर्ण करत छोट्या वाहनांवरील 28 टक्के जीएसटी थेट 18 टक्क्यांवर केला आहे. यामुळे नक्कीच कार खरेदीदारांना चांगला फायदा होणार आहे. हे जीएसटीचे नवीन दर येत्या 22 सप्टेंबर 2025 लागू होणार आहेत.
Tata Motors या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने आज घोषणा केली की, कंपनी ग्राहकांना त्यांच्या कार आणि एसयूव्हीवर नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या जीएसटी कपातीचा संपूर्ण फायदा देणार आहेत, जो सुधारित जीएसटी दर लागू होणारी तारीख २२ सप्टेंबर २०२५ पासून मिळेल.
Mercedes कडून 2025 GLC EV सादर, फक्त एका सिंगल चार्जवर मिळेल 713 किमीची रेंज
ही घोषणा करताना Tata Motors Passenger Vehicles Ltd. आणि Tata Passenger Electric Mobility Ltd. चे व्यवस्थापकीय संचालक Shailesh Chandra म्हणाले, “22 September 2025 पासून प्रवासी वाहनांवर लागू होणारी GST कपात हा प्रगतीशील आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय आहे. यामुळे भारतातील लाखो लोकांसाठी वैयक्तिक वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. माननीय पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार, माननीय अर्थमंत्र्यांच्या हेतूनुसार आणि आमच्या ग्राहक-केंद्रित तत्त्वज्ञानानुसार Tata Motors ही कपात थेट ग्राहकांना देईल आणि या सुधारणेचा उद्देश पूर्ण करण्यास कटिबद्ध राहील. या निर्णयामुळे आमच्या लोकप्रिय Car आणि SUV सर्व विभागांमध्ये अधिक सहज उपलब्ध होतील, पहिल्यांदाच Car खरेदी करणारे ग्राहक सक्षम होतील आणि नव्या युगातील वाहतुकीकडे वाटचाल अधिक वेगाने होईल.”
अरे बाप रे! एकीकडे GST कमी झाला असतानाच ‘या’ 5 बाईक्सच्या टॅक्समध्ये होणार वाढ
टाटा मोटर्सच्या कार आणि SUV च्या किमतींमध्ये मोठी कपात होणार आहे. टियागोच्या किमतीत सुमारे 75,000 रुपयांची, टिगोरमध्ये 80,000 रुपयांची, अल्ट्रोजमध्ये 1,10,000 रुपयांची तर पंचमध्ये 85,000 रुपयांची कपात होणार आहे. याशिवाय नेक्सॉनची किंमत तब्बल 1,55,000 रुपयांनी कमी होणार असून कर्व्हवर सुमारे 65,000 रुपयांची, हॅरियरवर 1,40,000 रुपयांची आणि सफारीवर 1,45,000 रुपयांची बचत ग्राहकांना होणार आहे. या निर्णयामुळे टाटा मोटर्सच्या लोकप्रिय कार्स अधिक परवडणाऱ्या दरात ग्राहकांच्या बजेटमध्ये येणार आहेत.